वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#Walnuttwists
# वॉलनट हरभरा कबाब

वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)

#Walnuttwists
# वॉलनट हरभरा कबाब

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 1गाजर
  3. 1/2मटार
  4. 1/2 कपपालक
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनजीरे पूड
  8. 1 टीस्पूनधने पूड
  9. 1/2 टीस्पून चाट मसाला
  10. 5-6हिरवी मिरची
  11. 4-5लसूण पाकळ्या
  12. 1 टीस्पूनआले
  13. 1 टेबलस्पूनबेसन पीठ
  14. 1 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  15. चवीनुसारमीठ
  16. 1/4 कपअक्रोड तुकडे

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घेणे. पालक स्वच्छ धून तो 3-4 मिनिट ब्लँच करून घेणे. गाजर खिसुन घेणे.लसूण मिरची आले पेस्ट करून घेणे.अक्रोड मिक्सर मधून क्रश करून घेणे.

  2. 2

    आता एका बाउल मध्ये बटाटे चे साली काढून तो स्मॅश करून घेणे. त्या मध्ये खिसुन घेतलेले गाजर, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, मटार आणि शिजवून घेतलेला पालक मिक्सर मधून बारीक करून घेणे. तो बटाटा मध्ये मिक्स करणे.

  3. 3

    आता या मध्ये सगळे मसाले घालून घेणे. व त्यात बायइंडिंग साठी बेसन पीठ, तांदूळ पीठ घालून घेणे. क्रश केलेले अक्रोड व चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करून घेणे.

  4. 4

    आता या पिठाचे छोटे गोळे करून ते हातावर गोल थापून घेणे. आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकता. असे करून प्लेट मध्ये ठेवणे.

  5. 5

    आता फ्राय पॅन मध्ये थोडे तेल सोडावे व त्या वर हे थापून घेतलेले कबाब ठेवावेत.बाजूने चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे. गॅस बारीक ठेवावा. 2 मिनिट झाली कि खालची बाजू पालटून घेणे. वरची बाजू खाली करावी. दोनीही बाजूने सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेणे.

  6. 6

    आता हे कबाब टिशू पेपर वर काढून घेणे. तयार हे कबाब गरम गरम सॉस, हिरवी चटणी सोबत सर्व्ह करावे. खूप टेस्टी आणि क्रिस्पी होतात.

  7. 7
  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes