हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#hr
बरेचदा लग्नामध्ये किंवा छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये कबाब सर्व्ह केले जातात. आणि जर मी गेले, तर हमखास मी त्याचा आस्वाद घेते. कारण मला ते प्रचंड आवडते... जेव्हा ही यांचा आस्वाद घेत असते, तेव्हा खाताखाताच मनात विचार करते, घरी गेले की नक्की करणार.. पण तो दिवस काही केल्या लवकर येत नाही... पण हो तोपर्यंत मात्र कुठल्या ना कुठल्या पार्टीचं इंविटेशन मात्र आलेले असत.. 😃
पण या वेळेला मात्र कुकपॅड वरती होळी स्पेशल मध्ये रेसिपीज दिल्या व त्यामध्ये हराभरा कबाब हे सुद्धा असल्याने लगेच ठरविले हरभरा कबाब करायचा म्हणजे करायचाच.... यासाठी कुकपॅड टिमला खुप खुप धन्यवाद 🙏🏻 त्यांच्या मुळे किती दिवसापासून मनात ठरविलेली इच्छा सरतेशेवटी सत्यात उतरली.. 😃🙏 हराभरा कबाब हा नाश्त्याचा प्रकार आहे, जो व्हेजिटेबल कटलेट सारखाच असतो.. पण यामध्ये पालक, हिरवेमटार, पोटॅटोचा समावेश केला जातो. हराभरा कबाब स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून कुठल्याही छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये सर्व्ह करू शकता...
सहसा कबाब गोल शेप मध्ये करतात. पण होळी असल्यामुळे मी थोड्या वेगळ्या प्रकारे केले.. म्हणजे बघा होळी मध्ये हात कलर नी भरले असतात.. अशाप्रकारे केलेले कबाब खायला सोयीस्कर पडते. हराभरा कबाबला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करता येतात. मी इथे दोन्ही प्रकारे करून बघितले.. खूप छान टेस्टी, हेल्दी झालेत....
तेव्हा नक्की ट्राय करा *हराभरा कबाब*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 125 ग्रामपालक
  2. 1 कपहिरवे वाटाणे
  3. 1-2पोटॅटो
  4. 2हिरवी शिमला मिरची
  5. 1कांदा चिरलेला
  6. 1 कपकोथिंबीर चिरलेली
  7. 5-6लसूण पाकळ्या
  8. 4-5हिरव्या मिरच्या
  9. 1 टेबलस्पूनजीरे
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1 टेबलस्पूनतिखट
  12. 1/2 टेबलस्पूनजीरे पावडर
  13. 1/2 टेबलस्पूनधनेपावडर
  14. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  15. 1/2 कपब्रेड क्रम्स
  16. थोडे से काजू
  17. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  18. 1/2 कपडाळवं / पंढरपुरी डाळ
  19. मीठ चवीनुसार
  20. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पालकाला स्वच्छ निवडून, धुऊन घ्यावे. गरम पाण्यामध्ये दोन मिनिटे ब्लांच करून घ्यावी. व मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. पोटॅटो उकडून तयार ठेवावे. हिरवे मटार सोलून रेडी करून ठेवावे.

  2. 2

    डाळवं देखील मिक्सर मधून बारीक करून घ्यावी.

  3. 3

    पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालावे. त्यामध्ये जीरे घालावे. जीरे तडतडले की, त्यात नंतर कांदा, हिरवी मिरची, हिरवेमटार, लसुन घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्यावे. व नंतर त्यात शिमला मिरचीचे काप घालावे एक मिनिट परतून घ्यावे. व गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. व थंड होऊ द्यावे.

  4. 4

    थंड झालेले मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. (एकदम पेस्ट करू नका)

  5. 5

    या मिश्रणामध्ये आता मॅश केलेले पोटॅटो, बारीक केलेली पंढरपुरी डाळ (याऐवजी तुम्ही बेसन,/ रवा/ तांदूळाचे पिठ किंवा पोह्याची पावडर करून वापरू शकता) तिखट, मीठ, जीरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    या मिश्रणाचे गोल गोल चपटे गोळे करून घ्यावे.व हे गोळे ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्यावे. त्याला काजू लावावे.(ऐच्छिक) तसेच आईस स्टीक ला लावून लांब कबाब तयार करून घ्यावे. (फोटोत दाखवीले तसे. तूम्हाला ज्या पद्धतीने करायचे, त्या प्रकारे करू शकता)

  7. 7

    नॉनस्टिक पॅनवर थोडेसे तेल लावून त्यावरती तयार स्टिक ठेवून, त्याला शॅलो फ्राय करून घ्यावे. किंवा तेलात तळून घ्यावे.

  8. 8

    तयार गरमागरम हराभरा कबाब हिरवी चटणी, टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.. 💃 💕

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes