हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#rbr #श्रावण शेफ वीक 2
बहनाने भाईके कलाईसे प्यार बांँधा है...प्यार के दो तारसे संसार बाँधा है।
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आवर्जून रेडिओ वर लागणारं गाणं...भावा बहिणीच्या अतूट अशा प्रेमळ नात्याची साक्षच देते!लहानपणापासून एकत्र वाढलेले,कधी भांडत तर कधी हसत खेळत,खोड्या काढत,एखाद्या गोष्टीसाठी तू तू मै मै करत आईबाबांच्या प्रेमळ छताखाली सुखेनैव वाढत असतात.भावाला काही झालं तर त्याची कळ बहिणीच्या ह्रदयात पोचते...इतकं हे जीवापाडचं नातं!
रक्षाबंधन,भाऊबीज हे तर भावाबहिणींचं प्रेमाचं द्योतक असलेले सण...हक्काने बहिणीने काही मागावं आणि भावाने ते द्यावं!अडचणीत असलेल्या बहिणीसाठी भाऊच पाठीराखा होतो.किंबहुना भावाने बहिणीचं रक्षण करायचं हीच आपली संस्कृती!मग ते रक्षण तिला एखाद्या संकटातून वाचवणारं असेल,सासरच्या जाचातून मुक्त करणारं असेल,कधी छेडछाड करणाऱ्या कोण्या मवाल्याला अद्द्ल घडवताना असेल,कधी आर्थिक मदतीच्या रुपाने तर कधी खंबीरपणे समाजात उभं रहाण्यासाठी असेल...भाऊच एखाद्या पहाडासारखा सतत बहिणीची सावली असतो.श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा...एकदा आंबा चिरताना श्रीकृष्णाचे बोट कापले.रक्ताची धार लागली,कृष्णाने बोटाला बांधायला चिंधी मागितली.. पण सुभद्रेकडे सगळे शालूशेले!नारदमुनी मग गेले..द्रौपदीकडे...तिने तिच्या नेसत्या साडीचा पदर फाडून कृष्णाचे बोट चिंधीने बांधले...याच द्रौपदीचे भर सभेत दुर्योधनाकडून वस्त्रहरण होताना तिने कृष्णाचा धावा केला आणि कृष्णानेच वस्त्र पुरवली व तिचे लज्जारक्षण केले!हा श्रीकृष्ण मानलेला भाऊ पण त्याने भावाचे कर्तव्य पार पाडले.अशी फार सुंदर संस्कृती आहे आपली!स्त्रीत्वाचा आदर करणारी❗🙏
आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने काहीतरी खास बेत तर हवाच...खास भावासाठी!!👍

.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5 व्यक्ती
  1. 1 लहानजुडी पालक
  2. 4मध्यम बटाटे उकडून
  3. 100 ग्रामढोबळी मिरची
  4. 100 ग्रॅमफ्रेंच बीन्स
  5. 100 ग्रॅममटार
  6. 100 ग्रॅमपनीर
  7. 1/4 कपताजा पुदिना
  8. 1/4 कपकोथिंबीर
  9. 2.5 टीस्पूनमीठ
  10. तळण्यासाठी तेल
  11. थोडे पाणी-टिक्की करताना
  12. कबाब बाईंडींगसाठी :
  13. 1/2 वाटीपोहे
  14. 3 टेबलस्पूनतांदूळ पीठी
  15. 2 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  16. मसाले :
  17. 2 टीस्पूनगरम मसाला
  18. 2 टीस्पूनधणेजीरे पूड
  19. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  20. 1 इंचआलं
  21. 5-6लसुणपाकळ्या
  22. 2-3हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    वरील सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन ठेवावी.
    एका नॉनस्टिक कढईत पाणी उकळण्यास ठेवावे. उकळलेल्या पाण्यात पालक घालावा आणि 1-2मिनिटे ब्लांच करुन घ्यावा.

  2. 2

    या पाण्यातून पालक काढून निथळून घ्यावा.आता हा पालक बर्फाच्या पाण्यात ठेवावा.म्हणजे काळा,ब्राऊन होणार नाही.हिरवा रंग कायम रहातो.
    एका मध्यम कढईत तेल तापत ठेवावे

  3. 3

    आता आलं-लसुण-मिरचीची पेस्ट तेलात परतावी.त्यावर बीन्स परतून घ्याव्यात.नंतर मटार दाणे परतावेत.

  4. 4

    ढोबळी मिरचीही परतून घ्यावी.सर्व परतलेले मिश्रण थंड होऊ द्यावे.मिक्सरमध्ये आता ब्लांच केलेला पालक,कोथिंबीर, पुदिना,सर्व परतलेल्या भाज्या व पोहे भिजवलेले...असे सर्व मिक्सरवर फिरवावे.

  5. 5

    मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे.त्यावर मीठ,आमचूर पावडर,धणेजीरे पूड,गरम मसाला घालावा. व एकत्र कालवावे. पनीर कुस्करून घालावे.
    उकडून बारीक केलेला बटाटा,डाळीचे पीठ,तांदूळपीठी हे घालून मिश्रण एकत्र करावे.व गोळा तयार करावा.

  6. 6

    आपले हराभरा कबाबचे मिश्रण तयार आहे.आता याच्या टिक्की करून घ्याव्यात.गँसवर कढईत तेल तापवून त्यात या टिक्की तळून घ्याव्यात.गरम गरम सर्व्ह कराव्या सॉस बरोबर😊

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes