क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
चार लोकांना
  1. 3उकडलेले बटाटे
  2. उकडलेला अंड
  3. 2 चमचेलाल तिखट
  4. 1/2 चमचाहळद
  5. चवीनुसारमीठ
  6. 1मोठा कांदा
  7. थोडी कोथिंबीर
  8. थोडा पुदिना
  9. 1 चमचाचाट मसाला
  10. 1 वाटीबारीक शेवया
  11. 2-3 चमचेतांदूळ पीठ

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    प्रथम बटाटे आणि अंडे उकडून घ्यावेत बटाटे मॅश करून त्यात कांदा लाल तिखट हळद मीठ चाट मसाला कोथिंबीर आणि पुदिना घालून एकत्रित करावे

  2. 2

    अंड्याचे चार भाग करून घ्यावेत शेवया बारीक करून घ्याव्यात तांदळाच्या पिठामध्ये थोडे मीठ घालून आणि पाणी घालून पातळ करावे

  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणाला नगेट्स आकार देऊन त्यात कापलेला अंंड घालावं बंद करून घ्यावे. नगेट्स तांदळाच्या पिठाचा पाण्या मध्ये डीप करून शेवयांची कोटिंग करावी पंधरा मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. नंतर डीप फ्राय करून घ्यावे. आतून नरम आणि वरुन क्रिस्पी असे नगेट्स तयार सरव्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes