दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्ही
दुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील.

दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)

#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्ही
दुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. कोफ्त्याला लागणारे घटक
  2. 200 ग्रामदुधी
  3. 1 कपबेसन
  4. 2 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनजिरें पावडर
  8. 1 टेबलस्पूनधने पावडर
  9. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  10. 1 टेबलस्पूनसफेद तीळ
  11. चवी नुसारमीठ
  12. तळण्यासाठी तेल
  13. ग्रेव्हीला लागणारे घटक
  14. 8-10काजू
  15. 1टोमॅटो
  16. 1कांदा
  17. 5-6लसूण पाकळ्या
  18. 4-5लवंगा
  19. 4-5काळी मिरी
  20. 1चक्री फुल
  21. 1मोठी वेलची
  22. 3-4हिरवी वेलची
  23. 1 इंचआले
  24. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  25. 1 टेबलस्पूनकाश्मिरी मसाला
  26. 1/2 टेबलस्पूनहळद
  27. आवश्यक्ते नुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    दूधीला खुप पाणी सुटते म्हणून आधी कोफ्ते करून घ्यावे. दुधी स्वच्छ धुवून साले काढून किसून घ्यावा.

  2. 2

    किसलेला दुधी घट्ट पिळून त्यातील पाणी काढून टाकावे. त्यात सर्व मसाले, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि तीळ घालून तांदुळाचे पीठ आणि थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घ्यावे. पीठ जास्त घट्ट करू नये.

  3. 3

    तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते गॅस मध्यम आचेवर ठेवून तळून घ्यावेत.

  4. 4

    ग्रेव्ही करण्यासाठी कांदा उभा आणि टोमॅटो चिरुन घ्यावे. लसूण सोलून घ्यावा.

  5. 5

    गॅसवर एका पॅन मध्ये थोडं तेल घेऊन त्यात कांदा परतुन घ्यावा. त्यानंतर त्यात सर्व खडे मसाले, काजू, आले लसूण घालून चांगले परतुन घ्यावे.

  6. 6

    परतलेले कांदा टोमॅटो थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे. ग्रेव्ही तयार.

  7. 7

    गॅसवर पॅन मध्ये तेल घालून ते तापल्यावर त्यात जिरें घालावे. तमाल पत्र घालावे. तयार केलेली ग्रेव्ही घालून तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे. त्यात तिखट, काश्मिरी मसाला, हळद, मीठ घालून ढवळून घ्यावे.आवश्यक तेव्हढे पाणी घालावे. उकळी आल्यावर त्यात तयार केलेले कोफ्ते सोडावेत. वरून कोथिंबीर घालावी.दुधी कोफ्ता करी तयार.

  8. 8

    दुधी कोफ्ताकरी पोळी, पराठा किंवा भाता बरोबर सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes