पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS7
#लाॅस्टरेसिपीज

तांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.
कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.
गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊
त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .
रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ‌...
कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊
चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपतांदळाचे पीठ
  2. 1/2 कपगूळ किंवा आवडीनुसार
  3. वेलचीपूड
  4. 1/4 कपओले खोबरे
  5. सुका मेवा आवडीप्रमाणे
  6. 1/2 कपपाणी
  7. 1 टेबलस्पूनतूप
  8. खायचा पिवळा रंग थेंबभर
  9. 2 टीस्पूनसाखर
  10. 1/2 लिटरदूध

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम पॅनमधे पाणी,साखर,तूप घालून एक उकळी आणावी.

  2. 2

    नंतर त्यात तांदळाचे पीठ घालून छान मिक्स करून घ्या. मोदकाचा उकड काढतो त्याचप्रमाणे उकड काढायची आहे.छान मिक्स करून ५ मि. झाकून गॅस बंद करा.

  3. 3

    प्लेटमधे उकड काढून तळहाताने छान मळून घ्या. व त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.

  4. 4

    दुसऱ्या पॅनमधे दूध गरम करून त्यात हे तयार गोळे सोडून ५ मि.मध्यम आचेवर शिजवून घ्या.

  5. 5

    नंतर त्यात ओले खोबरे, वेलचीपूड,गूळ घालून १० मि.शिजवून घ्या. व नंतर सुकामेवा,रंग घालून एकसारखे करून घ्या.

  6. 6

    पारंपरिक बोरांची खीर तयार आहे...😀😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes