खानदेशी दाल वाटी (खमंग व खुसखुशीत) (dal bati recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#dr
आज मी खानदेशात करतात तशी दाल बाटी ची रेसिपी शेअर करत आहे .खमंग व खुसखुशीत वाटी आंबट-गोड दाल ( वरण) बरोबर सर्व करतात

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

40  मिनिटे
3 ते 4 सर्व्हिंग्ज
  1. दाल साठी
  2. 50 ग्रामतुर डाळ
  3. 25 ग्राममुग डाळ
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनमोहरी
  8. 1कांदा
  9. 3 टेबलस्पूनशेेंगदाणे
  10. 7-8 लसूण पाकळ्या
  11. 1 टेबलस्पूनमीठ
  12. 1 टेबलस्पूनतिखट
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 7- 8आमसुल
  15. 2 टेबलस्पूनगुळ
  16. बाटी साठी
  17. 150 ग्रामगव्हाचे पीठ
  18. 50 ग्रामरवा
  19. 1 टेबलस्पूनओवा
  20. 1/3 टीस्पूनसोडा
  21. 1 टीस्पूनमीठ
  22. 1 टेबलस्पूनतेल
  23. 7-8 कढीपत्ता
  24. 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  25. 1 वाटीतळण्यासाठी तेल किंवा तूप

कुकिंग सूचना

40  मिनिटे
  1. 1

    दाल साठी..कुकर मध्ये दोन्ही डाळी, हिंग व पाणी घालून तीन शिट्ट्या करुन शिजवून घ्यावे

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी कढीपत्ता ची फोडणी करावी व लसूण,कांदा व शेंगदाणे परतून घ्यावे व त्यात तिखट, हळद व मीठ घालून डाळ मिक्स करावे

  3. 3

    वरण ला थोडी उकळी आल्यावर त्यात भिजवलेले आमसुल व कोथिंबीर घालून वरण ऊकळी आणावी व दाल तयार करून घ्यावी

  4. 4

    बाटी करता गव्हाच्या पिठात ओवा,सोडा, मीठ व तेल घालून मऊसर कणिक मळून 10 मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्याचे लहान लहान गोळे करून इडली पात्रात त्यांना बारा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे

  5. 5

    तयार बाटी ला थंड करून त्याचे चौकोनी किंवा पाहिजे अकराच्या कट करून तेलात किंवा तूपात खरपूस तळून घ्यावे. तयार बाटी आंबट-गोड डाळ बरोबर गरम गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes