दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#ccs
दाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ

दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)

#ccs
दाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. दाल बनवण्यासाठी
  2. 1/3 कपतुर डाळ
  3. 1/3 कपमूगाची सालीची डाळ
  4. 1/3 कपहरभरा डाळ
  5. 1/3 कपमसूर डाळ
  6. 1टोमॅटो
  7. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  8. 2 टेस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनधणे जीरे पूड
  12. 1 टीस्पूनगूळ
  13. 7,8कढीपत्ता पाने
  14. फोडणीसाठी -
  15. 1/2 टीस्पून मोहरी
  16. 1/2 टीस्पून जीरे
  17. 1/8 टीस्पून हिंग
  18. बाटी बनवण्यासाठी-
  19. 3 कपगव्हाचे पीठ
  20. 3 टीस्पूनरवा
  21. 3 चमचेतूपाचे मोहन
  22. 1 टीस्पूनओवा
  23. 1 चिमूटभरबेकिंग सोडा
  24. चवीनुसारमीठ
  25. चुरमा बनवण्यासाठी-
  26. 3तयार बाट्या
  27. 3 टेस्पूनतूप
  28. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  29. काजू बदाम पिस्ता काप
  30. 1/2 कपपीठीसाखर(किंवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता)
  31. 1/2 कप तूप

कुकिंग सूचना

40-45 मिनिटे
  1. 1

    डाळ बनवण्यासाठी, प्रथम डाळी काही वेळ भिजवून ठेवा. नंतर कूकरच्या भांड्यात घालून त्यात हळद आणि चिरलेला टोमॅटो घालून 4 शिट्या शिजवून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता आणि आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता लाल तिखट, धणे जीरे पूड घालावे. आता शिजवलेल्या डाळी घालून आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घाला. ते थोडे घट्ट होईपर्यंत उकळा. शेवटी, वरून कोथिंबीर घाला.

  3. 3

    बाटी बनवण्यासाठी, एका वाडग्यात जाड गव्हाचे पीठ घ्या. रवा, तूप, मीठ आणि ओवा घालून ते मिक्स करावे आणि कोमट पाण्याने पीठ मळून घ्यावे. पीठ 15 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कणकेचे गोळे बनवा.

  4. 4

    मी अप्पम पॅन आणि कढई मध्ये बाटी बनवली आहे. त्यासाठी अप्पम पॅन गरम करा, तूप घालून त्यात बाटी झाकून ठेवा आणि 5 मिनिटे शिजवा नंतर ते झाले का ते तपासा. पुन्हा 3 मिनिटे ठेवा. नंतर दुसऱ्या बाजूने बाटी फिरवा आणि झाकून ठेवा. बाटी बनवण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे लागतील. मंद आचेवर सर्व बाजूंनी गुलाबी होईपर्यंत बेक करा.

  5. 5

    ही बाटी कुकरमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये, स्टोव्हवर सुद्धा बनवता येते. नॉनस्टिक कढई मध्ये सुद्धा खूप चांगली बाटी बनवली जाते. पॅन गरम करा, त्यात तूप घाला, मग बाटी घाला आणि झाकण ठेवून शिजवा. पाच मिनिटांनंतर खालून बाटीवर रंग आला आहे का ते तपासा आणि तूप लावून बाटी दुसऱ्या बाजूने हलवा. बाटी तयार आहे.

  6. 6

    चुरमा बनवण्यासाठी, तीन तयार बाट्या घेऊन त्या कुस्करून घ्या. नंतर मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या. कढईत तूप टाकून मंद आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्या. पूर्ण थंड झाले की यात पिठीसाखर, वेलची पूड, काजू-बदाम पिस्ता काप घालून व्यवस्थित मळून घ्या. चुरमा तयार.

  7. 7

    दाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes