दाल-बाटी चुरमा (प्रसिद्ध राजस्थानी थाळी) (dal bati churma recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week4

माझे आवडते पर्यटन स्थळ - राजस्थान
ही थीम वाचल्यावर सर्वप्रथम कोणत्या डिश चे नाव मनात आले असेल तर ते हे.. "दाल-बाटी चुरमा".
मला राजस्थानला जाऊन ११ वर्ष झाली पण अजूनही मी तेथील दाल-बाटी चुरमा या प्रसिद्ध थाळी ची चव विसरले नाहीये. आणि तेव्हापासून ही माझी आवडती डिश बनली आहे. अधूनमधून मी ही डिश बनवत असते आणि या थीम च्या निमित्ताने पुन्हा बनवली.
अगदी सेम टेस्ट! तुम्हीही नक्की करून पहा. U'll love it!!!🙂

दाल-बाटी चुरमा (प्रसिद्ध राजस्थानी थाळी) (dal bati churma recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4

माझे आवडते पर्यटन स्थळ - राजस्थान
ही थीम वाचल्यावर सर्वप्रथम कोणत्या डिश चे नाव मनात आले असेल तर ते हे.. "दाल-बाटी चुरमा".
मला राजस्थानला जाऊन ११ वर्ष झाली पण अजूनही मी तेथील दाल-बाटी चुरमा या प्रसिद्ध थाळी ची चव विसरले नाहीये. आणि तेव्हापासून ही माझी आवडती डिश बनली आहे. अधूनमधून मी ही डिश बनवत असते आणि या थीम च्या निमित्ताने पुन्हा बनवली.
अगदी सेम टेस्ट! तुम्हीही नक्की करून पहा. U'll love it!!!🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मि.
  1. बाटीसाठी-
  2. 2कप गव्हाचे पीठ
  3. 2 टे.स्पून तूप
  4. 1 टीस्पून बेकिंग सोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. पाणी आवश्यकतेनुसार
  7. चुरम्यासाठी -
  8. 2बाटी
  9. 2 टे.स्पून ड्राय फ्रूट
  10. 1 टे स्पून साखर
  11. दाल साठी -
  12. 2 कप तूर डाळ
  13. 1 टीस्पून तूप
  14. २-३ कप पाणी (आवश्यकतेनुसार)
  15. 1कांदा चिरलेला
  16. 1टोमॅटो बारीक चिरून
  17. 2हिरव्या मिरच्या
  18. फोडणीचे साहित्य
  19. १ टीस्पून मोहरी, जिरे, हिंग, हळद प्रत्येकी
  20. 2 टे स्पून तिखट
  21. 1 टीस्पून गरम मसाला
  22. 1 टे स्पून तेल
  23. 1 टे स्पून कोथिंबीर बारीक चिरून
  24. 1/2 टे स्पून आलं - लसूण पेस्ट
  25. गाजर सजावटीसाठी

कुकिंग सूचना

४५ मि.
  1. 1

    बाटी: गव्हाचे पीठ, तूप, बेकिंग सोडा व पाणी आवश्यकतेनुसार घालून पीठ मळून घ्या.

  2. 2

    पिठाचे छोटे गोळे करून घ्यावे. आप्पे पॅन ला तेल लाऊन त्यात हे गोळे १० मि.साठी ठेऊन भाजून घ्यावे. नंतर खालची बाजू उलटुन पुन्हा १० मी. भाजून घ्यावे.

  3. 3

    बाटी तयार आहेत. बाटी तुपात बुडवून घ्याव्यात.

  4. 4

    चुरमा: त्यातील २ बाटी मिक्सर मध्ये बारीक करून काढून घ्या. त्यात ड्राय फ्रूट व साखर घाला व बारीक करून घ्या. (टिपः ड्राय फ्रूट मिक्सर मधून न काढता त्याचे कापही वापरु शकता.).

  5. 5

    आता कढईत तूप घालून त्यात हे मिश्रण ५ मी. परतून घ्यावे. चूरमा तयार आहे.

  6. 6

    दाल: डाळ धुऊन घ्या व त्यात पाणी आवश्यकतेनुसार घालून तूप घालून कुकरला ४ शिट्ट्या काढून घ्या.

  7. 7

    (टिपः तुम्ही तूर डाळी सोबत इतरही डाळी वापरु शकता. उदा: मसूर डाळ, चना डाळ, मूग डाळ ई.)

  8. 8

    आता कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे,हिंग,हळद घालून त्यात कांदा घालून परतून घ्या. लालसर झाल्यावर त्यात मिरची,आलं - लसूण पेस्ट घाला व परतून घ्या. आता त्यात टोमॅटो, गरम मसाला, मीठ व तिखट घालून परतून घ्या.

  9. 9

    मऊसर झाल्यावर त्यात डाळ घालावी व ५ मी.शिजवून घ्यावे. वरुन कोथिंबीर घालून परतून घ्या. डाळ तयार आहे.

  10. 10

    कांदा,गाजर व मिरची (तुमच्या आवडप्रमाणे) व सोबतच साजुक तुपात बाटी वाढून थाळी सर्व्ह करा. मी खाली दाखविल्याप्रमाणे दोन वेगळ्या प्रकारे सर्व्ह केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes