डाळ बाटी (dal bati recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#dr

डाळ बाटी (dal bati recipe in marathi)

#dr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. डाळ बनवण्यासाठी..
  2. 1/4 कपमुगाची डाळ
  3. 3 टेबलस्पूनचण्याची डाळ
  4. 2 टेबलस्पूनतुरीची डाळ
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1/4 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनराई
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 1 लहानकांदा
  10. 1 लहानटोमॅटो
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  14. चवीनुसारमीठ
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 1 टीस्पूनमिरची पावडर
  18. बाटी बनवण्यासाठी:
  19. 2 कपगव्हाचे पीठ
  20. आवश्यकतेनुसार तूप
  21. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मी इथे चणा डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ वापरली आहे... तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डाळीचे प्रकार कमी-जास्त करू शकता... फक्त एकत्र केल्यानंतर डाळ अर्धा कप होईल एवढं पहा... डाळ स्वच्छ धुऊन, कुकर मध्ये फक्त पाणी घालून पाच ते सहा शिट्टी घेऊन शिजवून घ्या... डाळ पूर्ण सॉफ्ट व्हायला हवी...

  2. 2

    भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात राई, जिर, हिंग, हिरवी मिरची मोठे तुकडे आणि आलं-लसणाची पेस्ट घाला... आलं-लसणाची पेस्ट परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला... कांदा ट्रान्सलुसंट झाल्या नंतर त्यात हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घाला... मसाले परतल्यावर टोमॅटो घालून सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या... मग त्यात शिजलेली डाळ घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला... डाळीला एक छान उकळी येऊ द्या... आपली डाळ तयार आहे... आवडत असेल तर चिमुटभर साखर घाला...

  3. 3

    गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे तूप घाला... घट्टसर पीठ मळून घ्या... तयार पीठ 15 ते 20 मिनिटे रेस्ट करू द्या...

  4. 4

    साधारण चपातीचा गोळ्या एवढे गोळे करून घ्यावे... मध्ये जे प्लस साईन दिसतं ते हातावर गोळे वळताना सेंटरला दाबून गोळा वाळून बनत... थोडा प्रॅक्टिस नंतर करता येणे शक्य आहे... पण जर जमत नसेल तर चमजाच्या दांड्याने कींवा चाकूच्या पाठच्या बाजूने सेंटरला असे मार्क करून घ्या... ह्यामुळे बाटी शिजवण्याचा वेळ कमी लागतो आणि व्यवस्थित आतपर्यंत बाटी शिजते...

  5. 5

    आता खरी कसरत म्हणजे ह्या बाटी शिजवण... तुमच्याकडे बाटी मेकर किंवा गॅस तंदूर असेल तर त्याचा वापर करा किंवा आप्पेपात्र चा वापर करू शकता... मी शिजवताना झाकण असलेल्या पॅनमध्ये थोडं तूप घालून, बारा ते पंधरा मिनिटं झाकून, दोन्ही बाजूने शिजवून घेतलं... पण अशा शिजवण्या मध्ये एक्स्पेक्टेड रंग येत नाही... हे फक्त शिजवण्या पुरता... त्यानंतर गॅस वर जाळी ठेवून वरून आणि खालून ब्राऊन करून घेतलं... आणि साईड साठी टुथ पिक मध्ये घालून डायरेक्ट फ्लेम वर भाजल...

  6. 6

    आला की नाही सुरेख रंग... पिठामध्ये मळताना तूप कमी घातलं तर असा रंग नाही येणार... त्यामुळे एवढ तूप तर घालाच...सर्व बाटी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये तूप घेऊन ह्या बाटी तुपामध्ये घोळवून घ्या... आपल्या बाटी खाण्यासाठी तयार आहेत...

  7. 7

    डाळ बाटी सर्व्ह करताना वरून तुपाची धार अवश्‍य घाला... डाळ बाटी मध्ये तुपाचा वापर सढळहस्ते करा तरच ती छान लागते... हे डाइट फुड नव्हे...😁🙈

  8. 8

    खाताना बाटी कुस्करून, त्यावर चमचाभर तूप घालून, त्यावर डाळ घाला किंवा तुकडे बनवून ते डाळीमध्ये डीप करून खा... आपल्या आवडीनुसार... मला पहिल्या प्रकारे आवडतं...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

Similar Recipes