फणसाचे घारगे (fansache gharge recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#pcm
कोकणात फणस पिकायला लागल्यावर फणसाच्या विविध पाककृती बनवल्या जातात. त्यातलीच एक फणसाचे घारगे. पाहुया कसे बनवायचे.

फणसाचे घारगे (fansache gharge recipe in marathi)

#pcm
कोकणात फणस पिकायला लागल्यावर फणसाच्या विविध पाककृती बनवल्या जातात. त्यातलीच एक फणसाचे घारगे. पाहुया कसे बनवायचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1 कपफणसाचा रस
  2. 1 कपतांदुळाचे पीठ
  3. 1/2 कपगव्हाचे पीठ
  4. 1/4 कपगुळ (आवडी नुसार कमी जास्त)
  5. 1/4 टेबलस्पूनहळद
  6. चिमूटभरमीठ
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    फणसाच्या रसात गुळ किसून घालावा आणि त्यात विरघळून घ्यावा.

  2. 2

    गव्हाचे पीठ आणि तांदुळाचे पीठ चाळून घ्यावे. त्यात मीठ आणि हळद घालून एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    पीठात फणसाचा रस घालून मळून घ्यावे. तेल किंवा तूप अजीबात घालू नये.

  4. 4

    मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे घेऊन पोळपाटाला आणि लाटण्याला तेल लावून पुरी सारखे घारगे लाटून घ्यावे.

  5. 5

    गॅसवर मध्यम आचेवर तेल तापवून त्यात घारगे गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्यावे. तेल निथळून घारगे काढून घ्यावेत. हे घारगे लोणच्या बरोबर किंवा चहा बरोबर खायला मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes