मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमुगडाळ
  2. 1 कपसाखर
  3. 1 कपतूप
  4. 1 टेबलस्पूनरवा
  5. 1 टेबलस्पूनबेसन
  6. 1/2 टीस्पूनविलायची पावडर
  7. 8-10केशरच्या काड्या
  8. 8-10 काजूचे काप
  9. 7-8 बदामचे काप
  10. 8-10पिस्ताचे काप
  11. 10-12मनुका
  12. सजावटीसाठी चांदीचा वर्ख

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मुगडाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि 4 ते 5 तासासाठी पाण्यात भिजवून ठेवावी.

  2. 2

    4-5 तासानंतर डाळीमधले पाणी काढून घ्यावे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवून व्यवस्थित कोरडी करून घ्यावी. आता ही डाळ मिक्सरमधून रवाळ पीठाप्रमाणे ग्राईंड करून घ्यावी. (जास्त बारीक वाटू नये) आणि बाजूला ठेवावी.

  3. 3

    आता एका वाटीमध्ये 1 टेस्पून गरम पाणी घेऊन त्यात 8 ते 10 केशरच्या काड्या टाकाव्यात. त्यानंतर गॅसवर मध्यम आचेवर एक गंज ठेवून त्यात 1 कप पाणी घालून त्यात 1 कप साखर टाकावी. साखर पूर्णपणे विरघळवून घ्यावी.

  4. 4

    साखर विरघळल्यावर त्यात विलायची पावडर आणि केशरचे पाणी ऍड करून मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करावे. साखरेचा पाक तयार आहे.

  5. 5

    आता एका कढईत 1 कप तूप घालून त्यात रवा आणि बेसन टाकून मिक्स करून घ्यावे. रवा आणि बेसन गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत हलवत राहावे. थोड्यावेळाने छान सुगंध येईल. त्यानंतर त्यात वाटलेली मुगडाळ टाकावी. मंद आचेवर डाळ जोपर्यंत गोल्डन-ब्राऊन होत नाही तोपर्यंत हलवीत राहावे. थोड्यावेळाने तूप वेगळे होताना दिसेल.

  6. 6

    आता शेवटी त्यात तयार केलेला साखरेचा पाक टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. 5 ते 10 मिनिटे सर्व साहित्य मोठ्या आचेवर हलवून घ्यावे. मुगडाळ हलवा तयार आहे.

  7. 7

    काजू, बदाम, पिस्ताचे काप आणि मनुकाने हलवा गार्निश करावा. त्यावर आणखी चांदीचा वर्ख लावून गरमागरम मुगडाळ हलवा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes