मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#cpm2
विक 2
#रेसिपीमॅगझीन
Week 2 recipemagzine

मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

#cpm2
विक 2
#रेसिपीमॅगझीन
Week 2 recipemagzine

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमूग डाळ
  2. 1 वाटीतूप
  3. 150 ग्रामखवा
  4. 1 वाटीसाखर
  5. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  6. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  7. 2 टेबल स्पूनकेसर दूध
  8. 2 वाटीगरम दूध
  9. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम मुग डाळ स्वच्छ धुऊन तीन ते चार तास भिजत घाला.चार तासानंतर पाणी काढून मिक्सर मध्ये मुग डाळ वाटून घ्या.

  2. 2

    आता एका कढईमध्ये तूप ऍड करून मध्यम आचेवर गरम करा.त्यामध्ये वाटलेली मूग डाळ घालून मिक्स करून छान रवाळ होईपर्यंत परतून घ्या. बारीक गॅसवर साधारण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये छान रवाळ परतुन होते. तोपर्यंत दुध गरम करण्यासाठी ठेवा.

  3. 3

    आता डाळ परतून झाल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घेणे आता यामध्ये गरम दूध आणि केसर चे दुध ऍड ॲड करा आणि छान मूग डाळीचा रवा मिक्स करून घ्या जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

  4. 4

    आता यामध्ये जायफळ पावडर,वेलची पावडर, खवा आणि साखर घालून छान मिक्स करून घेणे.

  5. 5

    आता साधारण 15 मिनिटे बारीक गॅस वरती हलवा छान परतून घ्या गरज वाटल्यास वरून दोन टेबलस्पून तूप ऍड करा आणि हलवा छान फुलू द्या. दहा मिनिटानंतर हलव्याला तूप सुटलेले दिसेल आणि हलकासा रंग चेंज झालेला असेल. मस्त असा आपला मूग डाळीचा हलवा तयार.

  6. 6

    सर्व्ह करताना वरून पुन्हा ड्रायफ्रुट्स किंवा पिस्ता टाकून सर्व्ह करू शकतो. असा हा मूग डाळीचा हलवा खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes