आळुवडी खमंग कुरकुरीत आळुवडी (alu wadi recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

महाराष्ट्रात प्रत्येक घरात सणावाराला केला जाणारी खमंग कुरकुरीत आळुचीवडी. 😋😋
#ashr

आळुवडी खमंग कुरकुरीत आळुवडी (alu wadi recipe in marathi)

महाराष्ट्रात प्रत्येक घरात सणावाराला केला जाणारी खमंग कुरकुरीत आळुचीवडी. 😋😋
#ashr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिटे
5 लोकांन करता
  1. 1.5 वाटीबेसन
  2. 15-20आळुपाने
  3. 1 ग्लासताक
  4. 5-6 हिरवी मिरची बारीक करून
  5. 4 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 2 टीस्पूनसाखर
  9. कोथिंबीर आवडीने
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 5-6लसुण
  12. 1 टेबलस्पूनतिळ
  13. मीठ चवीनुसार
  14. 6-7 कडीपत्ता पाने

कुकिंग सूचना

50 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला आळुचीपाने धुवून स्वच्छ घेणे त्याचे देठ काढून घेणे

  2. 2

    सुरवातीला सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे.

  3. 3

    एका वाटी मधे बेसणपिठ घालून त्यात हळद, जीरे, ओवा, हि. मिरची कुट, साखर, मीठ, ताक घालून मिक्स करणे.

  4. 4

    चव बघणे. मिश्रण घट्ट भिजवणे

  5. 5

    आळुचीपाने लावायला घेणे एका पानाला बेसणपिठ लावुन झाले की त्यावर 2 पान ठेवुन त्यावर पिठ लावणे असे एकावर एक 4 पाने लावुन घेणे. रोल करणे

  6. 6

    कढईत 2 ग्लास पाणी घालून गरम करायला ठेवणे. एका चाळणीला तेल लावून घेणे. त्यावर बेसणपिठ लावलेली आळुचीपाने ठेवणे.

  7. 7

    कढईतले पाणी गरम झाले की चाळणी त्यावर ठेवणे व नंतर मोठे ताट झाकून ठेवणे. साधारण 20-25 मिनिटे शिजवून घेणे.

  8. 8

    वडया उकडून झाल्या की जरा थंड होऊन देणे. त्याचे पातळ काप करणे.

  9. 9

    अत्ता पॅन गरम करून त्यामधे तेल घालणे मोहरी, हिंग, कडीपत्ता, लसुण बारीक चिरून, हळद, तिळ घालून घेणे त्यात आळुच्या वडीचे काप घालुन छान परतुन घेणे 7-10 मिनिटे परतले की आपल्या आळुचीवडी तयार आहे. ☺

  10. 10

    खमंग कुरकुरीत आळुचीवडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

Similar Recipes