कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#gur
गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.
रेसिपी खाली देत आहे.

कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)

#gur
गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.
रेसिपी खाली देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनटं
4 लोक
  1. 5अळूची वडीची मोठी पानं
  2. 1/2 कपचिंचेचा कोळ
  3. 3 टेबलस्पूनकिसलेला गूळ
  4. 1 कपबेसन
  5. 3-4 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  6. 5-6 लसणाच्या पाकळ्या
  7. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  8. 1हिरवी मिरची
  9. 1/4 टीस्पूनओवा
  10. 1/4 टीस्पूनजीरे
  11. 1/4 टेबलस्पूनहळद
  12. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  13. 1/2गरम मसाला
  14. मीठ चवीनुसार
  15. वडी तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

40 मिनटं
  1. 1

    अळूची पानं पाण्याने स्वच्छ धुऊन साफ करून घ्यावी.पानातील मधल्या शिरा सुरीने कमी करून थोड्या ठेचून घ्याव्यात. जेणेकरून अळुचे पान सहज फोल्ड होईल.एका बोल मध्ये बेसन, तांदळाचे पीठ,ओवा, जिरं,सर्व मसाले व मीठ मिक्स करून घ्यावे. चिंचेचा कोळ मध्ये गूळ मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    मिक्सरला आले,लसून,आणि मिरची वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. वाटलेली पेस्ट आणि चिंच आणि गुळाचा कोळ बेसन मध्ये मिक्स करावे. आवश्यक असल्यास थोडंसं पाणी मिक्स करून बेसनचा एक घट्ट्सर घोळ तयार करून घ्यावा.

  3. 3

    अळूच्या पानाला तेलाचा हात फिरवून घ्यावा व वरतून तांदळाचे पीठ भुरभुरावे.

  4. 4

    नंतर त्यावर तयार बेसनचा पातळसर थर लावावा. नंतर त्यावर दुसरे अळूचे पान उलट्या दिशेने ठेवावे. व त्यावर परत बेसनचा थर लावावा. अशाच प्रकारे सगळी पाने एकावर एक ठेवून दोन्ही बाजूने अळूची पानं फोल्ड करून पानाचा एक रोल तयार करून घ्यावा.

  5. 5

    स्टीमर मध्ये पाणी गरम करून त्यावर एक चाळणी ठेवून तयार पानांचा रोल पंधरा ते वीस मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यावा.

  6. 6

    पंधरा ते वीस मिनिटांनी वडी शिजली आहे की नाही ते चेक करावी. रोल वरचे पीठ बोटाला चिकटत नाही याचा अर्थ आपली वडी परफेक्ट शिजली आहे
    तयार रोल च्या वड्या पाडून घ्याव्यात व कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर वडी छान कुरकुरीत तळून घ्यावी.

  7. 7

    बाप्पाचा नैवेद्य साठी खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Top Search in

Similar Recipes