बटर लोडेड डबल मस्का पावभाजी (pavbhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#wdr

वीकेंड म्हटलं की,घरातील सर्वांनाच काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते.
त्यात पावभाजी म्हणजे माझ्या मुलांची फार आवडती ...😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

बटर लोडेड डबल मस्का पावभाजी (pavbhaji recipe in marathi)

#wdr

वीकेंड म्हटलं की,घरातील सर्वांनाच काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते.
त्यात पावभाजी म्हणजे माझ्या मुलांची फार आवडती ...😊
चला तर मग पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1 कपमटार
  2. 4-5बटाटे
  3. 1/2 कपफ्लाॅवर तुकडे
  4. 2सिमला मिरची बारीक चिरून
  5. 3मध्यम कांदे चिरून
  6. 4बारीक टोमॅटो बारीक चिरून
  7. 1बीट किसून किंवा बारीक तुकडे
  8. 1/4 कपकाश्मिरी लाल तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 2पॅकेट मॅगी मसाला (खूप छान चव येते याने)
  11. 1/2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  12. मीठ चवीनुसार
  13. बटर गरजेनुसार
  14. तेल
  15. कोथिंबीर बारीक चिरून
  16. 1 टेबलस्पूनआलं लसूण क्रश/पेस्ट
  17. लिंबू
  18. लादीपाव

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    कढईत तेल व आवडीनुसार बटर गरम करून त्यात आलं लसूण छान परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात लाल तिखट,हळद,मॅगी मसाला,पावभाजी मसाला घाला. नंतर त्यात सिमला मिरची,उकडलेल्या भाज्या घाला.

  4. 4

    स्मॅशरने स्मळॅश करून घ्या. जर ते करून भाजी छान चवदार होईल आणि मिळून येईल. बीटा मुळे छान रंग येतो.

  5. 5

    भाजी १५ ते २० मि. छान शिजू द्या. वरून पुन्हा बटर व कोथिंबीर घाला.

  6. 6

    डबल मस्का पावसाठी,
    मध्यम आचेवर तवा गरम करून त्यात बटर,पावभाजी मसाला, कोथिंबीर घालून छान मिक्स करा.
    पाव छान भाजून घ्या.

  7. 7

    तयार पावभाजी आपल्या आवडीनुसार गार्निश करून वरून भरपूर बटर,लिंबू पिळून, कोथिंबीर घालून मस्त गरमागरम गरम सर्व्ह करून आनंद घ्या!!😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes