झटपट जाळीदार रवा अप्पम (rava Appam recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#bfr

झटपट रवा अप्पम हा एक सोपा,खूप साॅफ्ट आणि तेलाचा वापर न करता अतिशय झटपट बनणारा नाश्ता आणि तितकाच पोटभरीचा ...😊
सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!
पाहूयात रेसिपी.

झटपट जाळीदार रवा अप्पम (rava Appam recipe in marathi)

#bfr

झटपट रवा अप्पम हा एक सोपा,खूप साॅफ्ट आणि तेलाचा वापर न करता अतिशय झटपट बनणारा नाश्ता आणि तितकाच पोटभरीचा ...😊
सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि ‌.
४ जणांसाठी
  1. 1कप रवा (कोणताही)
  2. २-४ कप दही
  3. मीठ चवीनुसार
  4. 2टीस्पून साखर
  5. 1/2कप पाणी
  6. 1पॅकेट इनो
  7. नारळाची चटणी

कुकिंग सूचना

१० मि ‌.
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यात रवा,दही,पाणी,साखर,मीठ घालून बारीक वाटून घ्या.

  2. 2

    वाटून झाल्यावर त्यात इनोचे एक पॅकेट घालून पुन्हा मिश्रण वाटून घ्या.

  3. 3

    एकीकडे डोसा तवा लगेचच गरम करून मध्यम आचेवर तेल न घालता डावाने मिश्रण अलगद तव्याच्या मधोमध सोडा. मिश्रण अजिबात डोश्याप्रमाणे पसरवू नये.

  4. 4

    थोड्याच वेळात अप्पमला छान जाळी पडेल. आणि अप्पम छान ड्राय झाला की अलगद काढा.

  5. 5

    बघा किती सुंदर जाळी पडली आहे अप्पमला...😊

  6. 6

    नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes