उत्तप्पम (uttapam recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#cpm7
# Weekly Recipe

उत्तप्पम (uttapam recipe in marathi)

#cpm7
# Weekly Recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 जण
  1. 3 वाटीतांदूळ
  2. 1 वाटीउडीद मोगर
  3. 1 टीस्पूनमेथीदाणा
  4. 2 टेबलस्पूनबटर
  5. पाणी
  6. चवीनुसारमीठ
  7. 1टोमॅटो
  8. 1कांदा
  9. कोथिंबीर बारीक चिरलेली
  10. 1 टीस्पूनलाल तिखट आवडीने
  11. 1 टीस्पूनजीरेपुड
  12. 1 टीस्पूनमीरेपुड
  13. मॅगी मसाला

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    तांदुळ व उडीद डाळ मेथीदाणे घालून भिजवून मिक्सरवर वाटून घ्यावी.रात्रभर झाकून ठेवून आंबवून घ्यावे..उत्तपम् बनवतांना त्यामध्ये मीठ घालावे व हळूवार हाताने ढवळून घ्यावे.मिश्रण पातळसरच असावे.

  2. 2

    आता निर्लेपचा तवा गॅसवर ठेवून गरम झाल्यावर बटर घालावे व पळीने गोल आकारात उत्तप्पम् घालावे.बाजूने बटर सोडावे..बटर मध्ये केलेले उत्तप्पम् चवीला खूप छान लागतात..वरून टाॅपींगसाठी टोमॅटो,कांदा,कोथिंबीर घालून लालतिखट जीरे पुड व मीरेपुड घालावी.झाकण ठेवून वाफवावे..आवडत असल्यास मॅगी मसाला घालावा.मी घालते, छान लागतो.

  3. 3

    आपले टेस्टी टेस्टी बटर उत्तप्पम् तयार आहेत...सांभर व चटणी सोबत सर्व्ह करावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes