दम आलू (Dum Aloo recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#ट्रेडिंग रेसिपीज

दम आलू (Dum Aloo recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामछोटे बटाटे
  2. 2टॉमॅटो
  3. 2कांदे
  4. 5लसुण पाकळ्या
  5. 8काजू
  6. आलं
  7. कोथिंबीर
  8. 2वेलच्या
  9. 5काळीमिरी
  10. 1/2 तुकडादालचीनी
  11. 1/4 वाटीदही
  12. बटाटे तळण्यासाठी साजुक तूप
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. कसुरी मेथी
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनतिखट
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. 1 टीस्पूनधने जीरे पावडर

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्या आता एका कूकर मधे घालून 1 शिट्टी करुण घ्या ते थंड झाल्यावर त्याची सालं काढून घेणे व फोक च्या सहाय्याने त्याला टोचे मारून घेणे

  2. 2

    नंतर एका कढईत तूप घालावे व त्यात बटाटे शालो फ्राय करून घेणे

  3. 3

    आता पण ग्रेव्ही करूया कढईत थोडेसे तूप घेणे तुपामध्ये वेलची,काळीमिरी, दालचीनी व कांदा परतून घेणे त्यानंतर त्यात टोमॅटो,लसूण,काजू व कोथिंबीर घालून परतून घ्यावी नंतर ते थंड झाल्यावर मिक्सरधून वाटून घ्यावे

  4. 4

    आता एका कढईत तेल घेणे तेलामध्ये तमालपत्र व जिर्‍याची फोडणी करून घेणे नंतर त्यात ग्रेव्ही घालावी ती तेलात परतून घेणे त्यानंतर त्यात दही घालून दोन मिनिटं सतत हलवत राहणे

  5. 5

    ग्रेव्ही ला तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने जीरे पावडर,मीठ,घालून घेणे. मसाले परतून झाल्यावर त्यात तीन वाट्या पाणी घालून घेणे व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी

  6. 6

    ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्यात बटाटे घालून दहा मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर छान उकळी येऊ द्यावी नंतर त्यात कसुरी मेथी घालून घेणे वरून थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम दमआलू सर्व्ह करावी. रोटी, नान,फुलका सोबत खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes