उकडलेल्या बटाट्याची  किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge

#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋

#Cooksnap

# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋

वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते.
माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनीटे
4जणांना
  1. 5-6मोठे बटाटे
  2. 6-7हिरव्या मिरच्या
  3. 1 टीस्पूनआल्याचे बारीक तुकडे
  4. कोथिंबीर भरपूर
  5. 10-12कढीपत्ता पाने
  6. फोडणीसाठी तेल मोहरी जीरे हिंग हळद
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/4 चमचासाखर
  9. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.

  2. 2

    बटाटे उकडून घ्या..

  3. 3

    बटाटे उकडून साले काढून बारीक चिरावेत मग मिरची व कोथिंबीर बारीक चिरा.

  4. 4

    कढई मध्ये तेल घेऊन मोहरी जीरे हिंग मिरची कढीपत्ता हळद कोथिंबीर घालून खमंग फोडणी करा व बटाट्याच्या फोडी,आल्याचे तुकडे घालून मीठ साखर घालून छान परता. वरून खोबरं कोथिंबीर घालून भाजी पुन्हा एकदा झाकण ठेवून छान परतून घ्या. वरून लिंबाचा रस घाला आणि भाजी पुन्हा एकदा परतून घ्या.

  5. 5
  6. 6

    तयार झाली आपली खमंग खरपूस उकडलेल्या बटाट्याची भाजी.. ही भाजी गरमागरम पोळी पुरी,भात लोणचं या बरोबर सर्व्ह करा.

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes