चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलो चिकन
  2. 1/2बासमती पुलाव बिर्याणी तांदूळ
  3. 1/2आल, लसूण, पुदिना पेस्ट
  4. 1/2दही
  5. 1 चमचाहळद
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 4हिरव्या मिरच्या
  8. 2 टॉमॅटो
  9. 5मध्यम आकाराचे कांदे
  10. 4लवंगा
  11. 4 हिरवी वेलची
  12. 1 मसाला वेलची
  13. 5 काळमिरी
  14. 2 इंचदालचिनी, 2 तमालपत्र, 2 त्रिफला
  15. 1 इंचदगड फुल, 1 लिंबू
  16. 1/2पुदिना व कोथिबीर
  17. 1 चमचाजिरेपूड
  18. 1 चमचा धने पावडर
  19. 1/4 चमचाशाह जीरे
  20. 4 चमचे तेल
  21. 2 चमचे तूप
  22. 2 चमचेमीठ
  23. 4 -5 केशराच्या काड्या पाणी

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ धऊन घ्या. चिकनला हळद, तिखट, मीठ अर्धा आल- लसूण पेस्ट,दही लावून ठेवावे. त्याच्यावर लिंबू पिळून मिक्स करावे आणि 3 ते 4 तास फ्रीज मध्ये ठेवून दया

  2. 2

    पुलाव बनवायला सुरुवात करण्या आधी अर्धा तास तांदूळ स्वच्छ धऊन तांदळाच्या वर 2 इंच पाणी येईल येवढया पाण्यात भिजत घालावे 5 कांद्यानं पैकी दोन कांद्याची भाजून व1 टोमॅटोची पीयूरी करून घ्या. 2 पातळ लांब चिरून घ्या. 1 थोडा जाड पण लांब चिरून घ्या.

  3. 3

    हिरवी वेलची, दालचिनी 1 तमालपत्र, 2 लंवगा मिक्सर मधून बरिक करुन घ्या.

  4. 4

    1 टोमॅटो बारीक चिरून घ्या, मिरची लांब चिरून घ्या. चमचा दूधात केशर घालून ठेवा

  5. 5

    कढईत तेल घालून गरम करून घ्या. त्यात पातळ चिरलेले कांदे तळून ते काढून घ्या. त्या तेलात तमालपत्र दालचिनी, लवंग, मसाला वेलची, शाह जीरे घाला. हिरव्या मिरच्या, लांब चिरलेले कांदा घाला

  6. 6

    कांदा गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो व चिमूटभर मीठ घालून परतावं बारीक गॅस करून झाकण ठेवावे

  7. 7

    टोमॅटो विरघळला की कांदा- टोमॅटो ची पीयुरी घालून परतावं. आलं लसूण पेस्ट घालून परतावं. हळद, तिखट पुलाव मसाला मैगनेट केलेलं चिकन घालून परतावे व झाकण ठेऊन 15 मिनिट शिजवावे त्यात थोडं गरम पाणी घालून चांगले उकळून घ्या

  8. 8

    तांदूळातिल सर्व पाणी निथळून घ्या. चिकनला उकळी आल्यावर त्यात तांदूळ घाला व परतून घ्या. तांदूळाच्या वर 1 इंच पाणी येईल एवढं गरम पाणी घालून मीठ घालावे व झाकण ठेवावं

  9. 9

    15मिनिटा ने झाकण काढून केशर, कोथींबीर पुदिना तळलेला कांदा घालून झाकण लावून ठेवावे व गॅस बंद करावा. पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes