मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB8 #W8
वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 कप भिजवलेले बासमती पुलाव तांदूळ
  2. 3/4 कपमटारचे दाणे
  3. 1मोठा कांदा उभा चिरून
  4. खडा मसाला -यामध्ये जीरे , लवंग,दालचिनी, तमालपत्र,वेलची, काळी मिरी
  5. 2 टेबलस्पुनतेल
  6. कोथिंबीर आवडीनुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टीस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम बासमती पुलाव तांदूळ स्वच्छ दोन-तीन वेळा पाण्याने धुवून साधारण अर्धा तास भिजवून ठेवा. दुसऱ्या बाजूला मटारचे दाणे ही पाण्यामध्ये धुऊन घ्या.

  2. 2

    प्रेशर पॅन घेऊन त्यामध्ये तेल घालून खडा मसाल्याची फोडणी करून घ्या. उभा चिरलेला कांदा या तेलामध्ये दोन ते तीन मिनिटात गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यानंतर भिजवलेला बासमती तांदूळ या तेलात घालून तोही एक दोन मिनिटं परतून घ्या. त्यानंतर मटारचे दाणे घालून तेही एक मिनिट या तेला मध्ये तांदळा बरोबर परतून घ्या.

  3. 3

    तांदूळ आधी भिजवलेले असल्यामुळे या पुलावामध्ये पाणी कमी टाका.चवीनुसार मीठ घालून मिश्रणात मिक्स करून हातावर घेऊन पाणी चाखून बघा, म्हणजे मिठाचे प्रमाण व्यवस्थित समजेल. आता या मिश्रणामध्ये एक टिस्पून गरम मसाला घाला, वरतून चिरलेली कोथिंबीर घालून बंद करा आणि एक शिट्टी काढून घ्या किंवा शिटी न लावता साधारण पंधरा ते वीस मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. नंतर गॅस बंद करून साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी गरम पुलाव सूप बरोबर सर्व्ह करा.

  4. 4

    तुमच्या आवडीचे कोणतेही सूप याबरोबर सर्व्ह करा.आमच्याकडे या पुलाव बरोबर टोमॅटो सूप आवडते...मी तेच केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes