झटपट कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya Kachrya recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#ngnr
कधी अचानक पाहुणे आले किंवा घाट घालून कोणताही भाजी करण्याचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर सर्वांच्याच आवडीचा असा बटाटा तोही अगदी कमी साहित्यात ,कांदा -लसुन -आलो यातलं काहीही वापर न करता तरीही चवीला उत्कृष्ट होणारा असा हा प्रकार म्हणजे झटपट होणाऱ्या कुरकुरीत खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या.....
चला तर मग पाहूया याची रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 5-6बटाटे
  2. 1 चमचाजीरे
  3. 1 चमचामोहरी
  4. 1 चमचातिखट
  5. 1/4 चमचाहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे सोलून घ्यावे त्यानंतर पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि मग बारीक चकती मध्ये ते कापावेत,
    आता गॅसवर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेउन तेल छान तापले की त्यामध्ये जीरे आणि मोहरी टाकावे, जीरे छान फुलले पाहिजे आणि मोहरी छान तर तोडली पाहिजे.

  2. 2

    त्यानंतर त्यात चिरलेले बटाटे घाला थोडी हळद घालावी.

  3. 3

    तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे व्यवस्थित ढवळून घ्यावे बटाट्याच्या काचऱ्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे गॅस हा मंद आचेवरच असला पाहिजे त्यावर च बटाटे छान परतून घेतले पाहिजे.

  4. 4

    साधारण आठ ते दहा मिनिट मध्ये बटाटे शिजून जातात पण मध्ये मध्ये ढवळत राहिले पाहिजे मंद आचेवर ते बनवले गेल्यामुळे बटाटे छान कुरकुरीत होतात अगदी कमीत साहित्यात बनणाऱ्या या बटाट्याच्या काचऱ्या लहान मुलांनाही फार आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

Similar Recipes