बटाट्याच्या काचर्या (batatyacha kachrya recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#pr
#बटाट्याच्या_काचर्या
अगदी झटपट तयार होणारी आणि ‌मस्त चमचमीत चविची अशी ही बटाट्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे.

बटाट्याच्या काचर्या (batatyacha kachrya recipe in marathi)

#pr
#बटाट्याच्या_काचर्या
अगदी झटपट तयार होणारी आणि ‌मस्त चमचमीत चविची अशी ही बटाट्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 4बटाटे
  2. 2 टीस्पूनतिखट पूड
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 2 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बटाट्याची सालं काढून त्याचे बारीक चौकोनी आकारात जास्त जाडं नसलेल्या फोडी करुन घ्याव्या. मग कढईत तेल घालून त्यात मोहरी, जीरे तडतडल्यावर हिंग घालून त्यावर बटाट्याच्या फोडी आणि मीठ घालून परतावे.

  2. 2

    मग तिखट पूड, हळद घालून परतून पाणी न घालता कढईवर झाकण ठेवून वाफ आणावी.

  3. 3

    ही भाजी सतत परतत रहावी यामुळे भाजी तळाला करपत नाही. भाजी शिजल्यावर गॅस बंद करून भाजीवर चाट मसाला घालून मिक्स करावे. मस्त चमचमीत भाजी तयार होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes