अंगारा कबाब (angara kabab recipe in marathi)

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar

अंगारा कबाब (angara kabab recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30मिनिटे
४ लोक
  1. १५० ग्रामबटाटा
  2. १५० ग्रामफ्लावर
  3. १५० ग्रामसिमला
  4. १५० ग्रामटम्याटो
  5. १५० ग्रामकांदे
  6. १५० ग्राममशरूम
  7. 2 चमचेअललसूनमिरची पेस्ट
  8. 1 चमचेहळद
  9. 1 चमचेतिखट
  10. 1 चमचेगरम मसाला
  11. किचन किंग मसाला
  12. हिंग
  13. धणेपूड
  14. कासुरिमेथी
  15. दही
  16. मगज
  17. लालमिर्ची सुकी रंगा साठी
  18. पनीर
  19. कोथिंबीर
  20. पुदिना
  21. मीठ
  22. तेल कोळसा
  23. तूप

कुकिंग सूचना

1 तास 30मिनिटे
  1. 1

    मिक्सरमध्ये १कांदा मध्यम आकाराचा, आलं लसूण मिरची पेस्ट 2 चमचे, ४लाल सुक्या मिरच्या पाण्यात भिजवून ठेवलेल्या, थोडी कोथिंबीर, पुदिना ९/१० पाने, कसुरी मेथी, किचन किंग मसाला, हळद, हिंग, तिखट, धणेपूड गरम मसाला प्रत्येकी पाव चमचा १वाटी दह्यात घालून त्यात ४चमचे मगज.

  2. 2

    चवीनुसार मीठ 2 चमचे तेल टाकून वाटून घेणे. सर्व भाज्या धुवून साधारण दीड इंचाचे तुकडे करून घ्यावे, छोटे बटाटे मिळाल्यास त्याला टोचे मारून 5 मिनिटे उकळत्या पाण्यात भिजवून काढून घेतले, पनीर चे थोडे मोठे तुकडे घ्यावेत.

  3. 3

    एक भांड्यात बाकी भाज्या व एक भांड्यात पनीर घेऊन वाटलेला मसाला त्याला चोळून ठेवला. साधारणपणे 2 तास हे सगळे मुरू दिले. त्यानंतर शेगडी पेटवून घ्यावी व त्यावर सळई ला लावून कबाब भाजून घ्यावे भाजताना त्यावर थोडे साजूक तूप टाकावे खमंग पणा येतो, शेगडी नसल्यास लोखंडी तवा गॅस वर ठेवून भाज्या त्यावर मांडून ही भाजू शकता, भाजताना त्यावर तूप सोडावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

Similar Recipes