पालक पराठा (palak paratha recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#ccs
मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्व
आयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे.
ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी.

पालक पराठा (palak paratha recipe in marathi)

#ccs
मुलांना भाज्या खाऊ घालायचा म्हणजे सर्व
आयांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.आणि त्याचे सोपे उत्तर आहे की त्याचे पराठे बनवणे.
ज्या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्या अशा अदृश्य स्वरूपात मुलांना खाऊ घातले की सर्व आया खूष. आणि त्यातही पालक मुलांना नकोच असतो.चला तर पाहूया त्याची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 जणांसाठी
  1. 4 कपगव्हाचे पीठ
  2. 1गड्डी पालक
  3. 2 चमचेतीळ
  4. 5हिरव्या मिरच्या
  5. 1 चमचाओवा
  6. 1 चमचाधना पावडर
  7. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  8. 2 चमचेतेल/तूप
  9. 1/2 चमचाजिरं
  10. 1 चमचामीठ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर पालक निवडून स्वच्छ धुऊन घेणे.आता 1 लिटर पाणी गरम करण्यास ठेवने. पाण्याला उकळी आली की दोन-तीन मिनिट पालक उकळून घेणे. नंतर पालक बाजूला काढून त्यावर थंड पाणी होत नाही आणि त्याची मिक्सरला पेस्ट करून घेणे

  2. 2

    आता बाकीचे साहित्य एकत्र जमवणे. आता पीठ सर्व मसाले आणि पालकाची प्युरी एकत्र करून घेणे. आता हे सर्व पीठ मिक्स करून त्याची घट्ट गोळा करून घेणे एक चमचा तेल लावून 15 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणे.

  3. 3

    आता मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन पिठामध्ये घोळवून थोडासा लाटून घेने त्यावर तेल लावणे वरतून पीठ टाकून चपाती सारखी घडी घालावी.

  4. 4

    आता या घडीचा मोठा जाडसर पराठा लाटून घेणे. गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणे वरतून आवडीनुसार तेल किंवा तूप लावून भाजून सर्व्ह करणे.

  5. 5

    आपल्या आवडीनुसार पराठा दह्या बरोबर किंव्हा लोनचा बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes