पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm6 week-6
#पालक-पुदीना पुरी
पौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात.

पालक-पुदिना पुरी (palak pudina puri recipe in marathi)

#cpm6 week-6
#पालक-पुदीना पुरी
पौष्टिक पदार्थ आहे. मुले पालेभाज्या जास्त खात नाही. त्यावेळी पराठे,पुरी,डोसा,इडली असे त्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले की,मुले खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5-6 जणांसाठी
  1. 1/2जुडी पालक
  2. 1/4 कपपुदीना
  3. 1/4 कपकोथिंबीर
  4. 3-4हिरव्या मिरच्या
  5. 8-10लसूण पाकळ्या
  6. 1 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1 टीस्पूनधने पावडर
  8. 1/2 टीस्पूनओवा
  9. 1 टीस्पूनतीळ
  10. 1.5 कपगव्हाचे पीठ
  11. 1/4 कपतांदळाचे पीठ
  12. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  13. 1 टेबलस्पूनदही
  14. 1 टेबलस्पूनतेल
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पालक,पुदीना,कोथिंबीर निवडून,स्वच्छ धुवून घेणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, पुदीना,कोथिंबीर,लसूण हिरव्या मिरच्या घालून बारीक पेस्ट करून घेणे.

  2. 2

    एका वाटी मध्ये सर्व पिठे घेणे.त्यात धने-जीरे पावडर,मीठ,ओवा,तीळदही घालून मिक्स करून घेणे.तेल घालून परत एकदा मळून घेणे. तांदळाचे पीठ घातल्याने कुरकुरीत होतात.

  3. 3

    त्यात पेस्ट घालून पीठ मळून घेणे. वरून तेल लावून मळून घेणे. 10 मिनिटे झाकून ठेवावे.

  4. 4

    मोठा एक गोळा घेऊन पोळी मध्यम जाडसर लाटून घेणे. वाटीने किंवा कटरने गोल कापून घेणे.
    दुसरी पद्धतीने ही पुरी लाटून घेणे. छोटे छोटे गोळे करून घ्यावे व त्याच्या पुऱ्या लाटून घेणे.

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की, गॅस मध्यम आचेवर ठेवून पुऱ्या दोन्ही बाजूंनी छान तळून घेणे.

  6. 6

    हया पुऱ्या हिरवी चटणी,टोमॅटो सॉस किंवा नुसत्या खायला पण लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes