खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय...

खीर तांदुळाची (kheer tandulachi recipe in marathi)

#nrr # आज मी, माझ्या नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या प्रकारे केलीय खीर.. छान स्वादिष्ट झालीय...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनसुवासिक तांदूळ
  2. 1 लिटरदूध
  3. 1/2 कपसाखर किंवा चवीप्रमाणे
  4. सुकामेवा
  5. केशर
  6. वेलची पूड
  7. जायफळ पूड
  8. 2 टीस्पूनतूप
  9. 1 टेबलस्पूनचारोळी
  10. 1-1/2 टेबलस्पूनकाजूची पूड
  11. 1-1/2 टेबलस्पूनबदामाची पूड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    तांदूळ, आधी अर्धा तास भिजत घालावे. पाण्यातून काढून निथळून घ्यावे. त्यानंतर, गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकून त्यात तांदूळ, सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर तांदूळ एका भांड्यात काढून घेऊन त्यामध्ये हे एक कप गरम दूध टाकावे. आणि एक तास झाकून ठेवावे. आता मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ, काजूची पूड आणि बदामाचे पूड टाकावी. गरजेनुसार त्यात दूध टाकून थोडी पातळसर पेस्ट करून घ्यावी. म्हणजे दुधात टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होणार नाहीत.

  3. 3

    थोड्या कोमट दुधात केशर टाकून ठेवावे. आता गॅसवर पॅन मधे दुध उकळवण्यासाठी ठेवावे. दुधाला उकळी आली की त्यात तांदळाचे तयार पेस्ट टाकावे.पेस्ट टाकताना सतत फिरवत राहावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात साखर टाकावी. बारीक केलेले तांदूळ शिजेपर्यंत, कमी गॅसवर ढवळत राहावे. म्हणजे बुडाला लागणार नाही. त्याचप्रमाणें त्यात केशराचे दूध टाकून घ्यावे.

  5. 5

    तोपर्यंत सुकामेवा थोड्या तुपात परतून घ्यावा. तांदूळ शिजले, की गॅस बंद करावा. त्यात सुकामेवा, चारोळी, वेलची पूड, जायफळ पूड घालून मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    अशाप्रकारे तांदुळाची, स्वादिष्ट खीर तयार आहे. आता ही खीर तुम्ही, जेवणासोबत गरमागरम खाऊ शकता, किंवा फ्रीज मध्ये ठेवून, थंड करून डेझर्ट म्हणून, सर्व्ह करू शकता, मनाप्रमाणे सजावट करून.. पण आम्ही मात्र, गरमागरम, पोळी सोबत ही खीर खाल्ली..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes