भाजणिची खुसखुशीत चकली (bhajniche chakli recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#dfr
#दिवालीरेसिपीचॅलेंज
चकली खुसखूशीत व्हायला हवी यासाठी अतीशय निघूतीने केली तरच जमली अशी माझी आई म्हणते.तीच्या हातच्या चकली प्रमाणेच चकली बनवलीय त्यात काही तीच्या टीप्स कामी आणूनच मी शीकलीय हा चकलीचा प्रपंच. चला तर मग बघूया कशी झालीय ही चकली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6 कपभाजणीचे पीठ
  2. 5 कपपाणी
  3. 3 टेबलस्पूनतीळ
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 3-1/2 टेबलस्पूनतीखटआवडीप्रमाणे प्रमाण कम जास्त करा
  7. 1-3/4 टेबलस्पूनमीठ
  8. तळण्यासाठी तेल
  9. 3 टेबलस्पूनतेल मोहनासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.
    पाणी गरम करायला ठेवा.तेल चांगले कडकडीत तापवून घ्या (3टेबल स्पून).

  2. 2

    पीठात तेलाचे मोहन घालून चांगले पीठाला लावून एकजीव करून घ्या. पीठात तिखट,मीठ,हळद,हींग तीळ घालून घ्या. एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता त्यात गरम पाणी घालून पीठ चमच्याने ढवळून भिजवून घ्या. व झाकण ठेवून द्या.पंधरा मिनिट

  4. 4

    आता जेव्हढा गोळा सोय्रात मावेल तेव्हढाच बाजूला काढून मळून घ्या व मगच सोय्रात भरून घ्या. परत उरलेल्या गोळ्यावर झाकण ठेवून द्या. असेच सगळे पीठ थोडे थोडे मळून चकल्या बनवून घ्या.

  5. 5

    तेल लोमिडियम फ्लेमवर तापवून घ्या. चकल्या तळून घ्या.

  6. 6

    सगळ्या चकल्या तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

Similar Recipes