चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 -तास
4-झणानसाठी
  1. चकली भाजणी साहीत्य
  2. 200 ग्राम मेझर कप मापे.
  3. 4 कपतांदूळ
  4. 2 कपचना डाळ
  5. 100 ग्रामऊडद डाळ
  6. 100 ग्राममूग डाळ
  7. 100 ग्रॅमज्वारी
  8. 100 ग्रामगहू
  9. 100 ग्रामपोहे
  10. 1/4 कपसाबूदाणे
  11. 50 ग्रामधणे
  12. 50 ग्रामजीरे
  13. चकली साठी..
  14. 2-1/2 कपभाजणी पिठ
  15. 2-1/2 कपपाणी
  16. 1 टीस्पूनतीखट
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 1 टेबलस्पूनतीळ
  19. 1 टीस्पूनओवा
  20. 1 टीस्पूनमीठ
  21. 1 टीस्पूनहीरव्या मीर्ची,कोथिंबीर पेस्ट
  22. 3 टीस्पूनतेल मोहन
  23. 500 ग्रामतेल तळायला

कुकिंग सूचना

1 -तास
  1. 1

    प्रथम भाजणी करतांना सगळ साहीत्य काढून घेणे...त़ादूळ आणी डाळी धूवून पंख्या खाली कपड्यावर वाळवून घेणे...आणी एक करून सगळे साहीत्य लो ते मीडीयम आचेवर खमंग नं जाळता भाजून घेणे

  2. 2

    भाजणी तयार....थंड करून चक्कीवर दळून घेणे...

  3. 3

    चकली साठी जेव्हड पिठ मोजून घेणार तेव्हडच मोजून पाणी गँसवर गरम करायला ठेवणे...सगळे मसाले काढून घेणे...

  4. 4

    गरम पाण्यात सगळे मसाले टाकणे...तेलपण टाकणे...

  5. 5

    पाणी ऊकळले की पिठात टाकणे आणी चमच्याने मीक्स करून घेणे...

  6. 6

    मीक्स झालेल पिठ झाकून 5- 8 मींट ठेवणे नंतर झाकण काढून पीठ थोड थंड करून छान मळून घेणे....

  7. 7

    चकलीच्या साच्याला तेल लावून घेणे...आणी भीजलेल्या पिठाचा गोळा साच्यात टाकणे नी पाँलिथीन पेपर वर चकल्या पिळून घेणे...

  8. 8

    गँसवर कढईत तेल गरम करणे नी त्यात चकल्या टाकणे..नंतर गँस मीडीयम करून चकल्या कूरकूरीत तळून घेणे....हाय ते मीडीयम आचेवर सगळ्या चकल्या तळून घेणे...

  9. 9

    चकल्या खाण्यासाठी तयार...

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes