पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#HLR
हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक स्वादासोबत च आरोग्यासाठीही उपयुक्त असते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग
  1. 1/2 वाटीतूरीची डाळ
  2. 1/2 वाटीमुगाची डाळ
  3. 2 टेबलस्पूनमटकीची डाळ
  4. 200 ग्रामपालक
  5. 2टोमॅटो
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 7-8 खोबऱ्याचे काप
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. चवी नुसारमीठ
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  13. 1-1 टीस्पूनजीरे मोहरी
  14. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम डाळी काढून घ्या. पालक स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    टोमॅटो आणि पालक चिरुन घ्या. शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप काढून ठेवा. सर्व डाळी धुवुन घ्या. कूकर मध्ये डाळी, पालक (अर्धी पालक फोडणीत घालण्यासाठी ठेवून द्या) खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे एकत्र करून 3 सिट्ट्या येऊ द्या.

  3. 3

    कूकर थंड झाल्यावर डाळ आणि पालक रवीने घोळून घ्या. एका प्लेट मध्ये तिखट, हळद मीठ काढून ठेवा.

  4. 4

    फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे तडतडल्यावर कांदे लालसर होईपर्यंत परतून घ्या. आले लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्या. तिखट हळद मीठ घालून मिक्स करून घ्या. टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिट शिजवुन घ्या. थोडी वाचवून ठेवलेली पालक टॉमेटो सोबत मिक्स करून घ्या.

  5. 5

    टोमॅटो शिजल्यावर त्यात कूकर मधील मिक्स केलेली डाळ पालक ओतून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 ते 4 उकळ्या फुटू द्या.

  6. 6

    आपली पालक ची डाळ भाजी तयार आहे. पोळी व भातासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

टिप्पण्या

Similar Recipes