पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)

#cpm4 # पौष्टिक असा पालक वापरून, जास्त कुठलेही सामग्री न वापरता, पटकन होणारा, पालक पुलाव..
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#cpm4 # पौष्टिक असा पालक वापरून, जास्त कुठलेही सामग्री न वापरता, पटकन होणारा, पालक पुलाव..
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ निवडून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा आणि पंधरा मिनिटे भिजत ठेवावा. त्यानंतर तांदळाच्या तिप्पट पाणी घेऊन एका भांड्यात गॅसवर उकळत ठेवावे. त्यात थोडेसे मीठ आणि किंचित तेल टाकावे. पाणी उकळल्यावर त्यात भिजलेले तांदूळ टाकावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे. आणि अर्धवट शिजलेले तांदूळ बघून गॅस बंद करावा.
- 2
आता अर्धवट शिजलेल्या तांदळाला गाळणीने गाळून घ्यावे. वरून थोडे थंड पाणी टाकावे. म्हणजे भात मोकळा होतो. तांदूळ पूर्ण शिजलेला नसावा,याची काळजी घ्यावी.
- 3
आता आपण पालकाकडे वळूया. त्यासाठी पालक तोडून आधी दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर पालकाला ब्लांच करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी, थोडी साखर टाकून ठेवावे. त्यामध्ये एक मिनिट पालक टाकावा व ठेवावा. आणि त्यानंतर लगेचच त्यातून काढून तो पालक थंडगार पाण्यात टाकावा.
- 4
आता हा ब्लांच केलेला पालक, मिक्सर च्या भांड्यात टाकून त्याची प्युरी बनवून घ्यावी. अशा रीतीने अर्धवट शिजलेला भात आणि पालक प्युरी तयार आहे. आता पुलाव मध्ये टाकण्यासाठी एका भांड्यात तेल टाकून, त्यामध्ये सुरुवातीला काजू आणि बदाम टाकावे. खोबऱ्याचे काप टाकावे. किंचित परतल्यावर त्यातच किसमिस टाकावे.आणि गॅस बंद करावा.
- 5
त्यानंतर हा सुकामेवा बाजूला काढून घ्यावा.
- 6
आता एका भांड्यात तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे टाकावे. तेजपान, लवंग, मिरे, दालचिनी, विलायची टाकावी. किंचित परतल्या नंतर त्यात हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, तिखट, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ आणि पालक प्युरी टाकून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात अर्धवट शिजलेला भात टाकून हलक्या हाताने मिक्स करावा. आता त्यात परतलेला सुका मेवा टाकावा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे.
- 7
सुका मेवा मिक्स केल्यानंतर, झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घ्यावी.आणि एक चमचा साजूक तूप टाकावे वरून..
आता पालक पुलाव तयार झालेला आहे. आता वरून कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. मी यात पालकाचे प्रमाण कमी वापरलेले आहे. जास्त वापरले तर थोडा कडवटपणा येतो.पण आवडत असेल तर पालक जास्त वापरून छान हिरवा रंग येतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4#week4#व्हेज_पुलावव्हेज पुलाव ही साधी सोपी झटपट होणारी आणि तेवढीच रुचकर आणि स्वादिष्ट असणारी पाककृती... घाईगडबडीत किंवा बिझी शेड्युल मध्ये काही मिनिटात होणारा व्हेज पुलाव.. 💃 💃 💕 💕 Vasudha Gudhe -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)
#GA4#विक८#पुलाव#हंडीपालकपुलाव#हेल्दीपौष्टिकहंडीपालकपुलावगोल्डन एप्रन मधील किवर्ड पुलाव.....पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव. Swati Pote -
पालक मिक्स व्हेजिटेबल पुलाव (palak mix vegetable pulav recipe in marathi)
नेहमी नेहमी वरण-भात-भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला. त्यामुळे पालक मिक्स व्हेजिटेबल पौष्टिक पुलाव आज करण्याचे ठरवले rucha dachewar -
ग्रीन मसाला(coriander) पुलाव (green masala pulav recipe in marathi)
#cpm4 पुलाव ही आमच्याकडे सर्वांना आवडणारी डिश.. जी खूप पटकन होते आणि ती करण्यासाठी फार काही सामग्री लागत नाही. घाईच्या वेळेत जेव्हा काही करायचे असते तेव्हा मी व्हेजिटेबल पुलाव बऱ्याच वेळा करते. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करून मी पुलाव बनवत असते, आजचा पुलाव मी ग्रीन मसाल्यामध्ये केलेला आहे . पुलाव पटकन करण्यासाठी मी कुकर चा वापर केलेला आहे. ग्रीन मसाल्यामध्ये फक्त कोथिंबीर मी वापरली आहे जी आपल्या घरी नेहमी असते.Pradnya Purandare
-
पुदिना ग्रीन पुलाव (pudina green pulav recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड pulao , अनायासे घरी पुदिना असल्यामुळे, लगेचच हा पुलाव केला . छान चवदार, सुगंधी आणि मोकळा झाला आहे...आपल्या आवडीप्रमाणे त्यात काही वेगळे पदार्थ टाकू शकतो... Varsha Ingole Bele -
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
आपल्या देशात विविध प्रकारचे लोक आहेत.त्यामुळं तेथील वातावरण संस्कृतीत विभिन्न प्रकार अढ तात. काशीमिरी पुलाव त्यातीलच.काश्मीर मध्येतर भरपूर dry fruits. त्याचाचवापर करून ही रेसीपी.खूप सुंदर होतो कश्मिरी पुलाव..🍚🍚 Anjita Mahajan -
-
-
-
तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हा झटपट होणारा, चविष्ट असा स्ट्रीट फूड चा प्रकार आहे.#cpm4 Kshama's Kitchen -
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 व्हेज पुलाव म्हणजे वन डीश मील.भरपूर प्रमाणात घातलेल्या भाज्यांची खूप सुंदर चव पुलावाची रंगत वाढवते.अतिशय नेत्रसुखद असा हा पुलाव जिव्हातृप्तीचा खरा आनंद देतो.मला स्वतःला पुलाव ,बिर्याणी खायला,खिलवायला फार आवडते.आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी पुलाव होतोच.त्यातील खडा मसाले हा पुलावाचा आत्माच आहेत.खाताना टचकन दाताखाली येणारी दालचिनी असो की एखादा मिरा,किंवा वेलचीचे दाणे...अहाहा!केवळ अप्रतिमच🤗मी एका प्रथितयश हॉटेलमध्ये नोकरी करत असे.त्यावेळी व्हेज पुलाव,पालक पुलाव,टोमॅटो पुलाव,राजमा पुलाव असे विविध रंगी आणि अफलातून चवीचे पुलाव मी टेस्टही केलेत.पुलाव आणि टोमॅटो सार/सूप हे एक मस्त कॉंबिनेशन आहे.तिकडे मी लोकांना पार्टीसाठी मेनू सुचवताना व्हेजपुलाव असेल तर इतर मेनूमध्ये पुलावातीलच भाज्या येणार नाहीत असा मेनू डिझाइन करुन दिला की पार्टी माझ्यावर जाम खूश व्हायची....तर असो.😍त्यामुळे पुलाव हा माझा वीकपॉइंटच म्हणा ना!😊एकाचवेळी फायबर्स,कार्ब्ज, प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त असा पुलाव हे एक हेल्दी फूड आहे.त्यामुळे जास्त वेळ न घालवता व्हेज पुलावाच्या कृतीकडे वळू या...🤗😋 Sushama Y. Kulkarni -
व्हेज पालक पुलाव (veg palak pulav recipe in marathi)
#cpm4#Week4#व्हेज_पालक_पुलाव...🌱🌿😋 पालक...वर्षातील बाराही महिने मिळणारी ही पालेभाजी..आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाचा मेंबर...कारण निसर्गानेच या हिरव्यागार पालकाकडे लोह,iron चे पालकत्व बहाल केलंय...आणि ही जबाबदारी पालक इमानेइतबारे पार पाडत आहे... त्यामुळेच जी मंडळी आपल्या आहारात नित्य पालकाचे या ना त्या रुपात सेवन करतात..त्यांच्या शरीरात लोह, हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम नीट ठेवून अॅनिमिया दूर करण्याच्या जबाबदारीचं काम पालक आज्ञाधारी बालकासारखं करत असतो..म्हणजे बालक पालक या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या वठवून आपले महत्त्व देखील कायम राखत आहे... आपण देखील आपल्या मुलांचे पालकत्व निभावताना कधी बालक होऊन त्यांना समजून घेतो तर कधी स्वत:च हट्टी बालक होतो...त्याचवेळेस लहानपणी लहान सहान गोष्टींवर आपल्यावर अवलंबून असणारी बालकं काहीवेळेस अचानक त्यांच्यात मोठेपणा येतो ,कुठून तरी शहाणपण येतं त्यांना ..आणि त्या नेमक्या क्षणी कधी ते आपलेच पालक होतात हे आपल्याला कळत देखील नाही...😊....पटली ना ही बालक पालक chemistry..😍 चला तर मग व्हेज पालक पुलाव या स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
व्हेज मेथी पुलाव (veg methi pulav recipe in marathi)
#cpm4#मॅगझीन week4हा एक वेगळ्या प्रकारचा व्हेज पुलाव आहे. यात मी इतर भाज्या सोबत मेथीदाण्याचे उपयोग केला आहे. याची चव कृष्ट असून अतिशय हेल्दी आहे. Rohini Deshkar -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)
#cpm4नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍 Vandana Shelar -
-
शाही मोती पुलाव (shahi moti pulav recipe in marathi)
#cpm4नवाबांच्या काळात हा शाही पुलाव तयार होत असे. त्यातूनही ते वैभवाचे दर्शन घडवत. Manisha Shete - Vispute -
इन्स्टंट पुलाव (instant pulav recipe in marathi)
#डिनरमंगळवार - पुलावडिनर प्लानरची पहिली रेसिपी झटपट होणारा असा प्रकार Dhanashree Phatak -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
लहान मुलांना तसेच मोठ्याना टेस्टी व हेल्दी अशी खास रेसिपी मी घेऊन आली आहे. झटपट व चटपटीत असा व्हेज पुलाव. एकदा बनवाल तर बोटी चाटतच रहाल. तर आपण बघू व्हेज पुलाव ची रेसिपी#cpm4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)
झटकन होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ म्हणजे आपला शाही पुलाव. यात सर्व भाज्या आहेत त्यामुळे पौष्टीक आहार आहे.#cpm4 Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या