पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)
हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक ते दीड तास
६-७ व्यक्तींसाठी
  1. 1जुडी पालक
  2. 2हिरव्या तिखट मिरच्या
  3. 1-1.5 इंचआलं
  4. 2 वाट्यागव्हाचं पीठ
  5. 1 चमचाओवा
  6. 1/4 चमचादालचिनी पावडर
  7. 1/4 चमचाआमचूर पावडर
  8. 1 चमचाजिरा पावडर
  9. 1/4 चमचामीठ
  10. पाणी - आवश्यक वाटल्यास
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

एक ते दीड तास
  1. 1

    पावसाळा असल्याने पालक च्या पानांत कीड असण्याची शक्यता असते. चांगली पानं देठांसकट खुडून घ्यायची. तुरटीच्या पाण्याने कमीतकमी दोनदा तरी धुवून घ्यायची. आम्हाला नेहमी सगळ्या भाज्या तुरटीच्या पाण्याने धुवायची सवयच लागली आहे. गरम - थंड पाण्यातून काढायची असल्यास काढावी. परंतु आयुर्वेदानुसार असं ब्लांचिंग करू नये. मी पालक धुवून तसाच रस वापरते.
    पालकची पानं, आलं, मिरच्या बारीक कापून घ्यायचे. मिक्सर ला फिरवून घ्यायचे. पालकात पाणी आणि मीठ(सोडियम) खूप असतं त्यामुळे पाणी आणि मीठ घालायची गरज भासत नाही.

  2. 2

    २ वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यात ओवा, दालचिनी - जीरे - आमचूर पावडर, मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. त्यात पालक चा रस घालायचा. मळून घ्यायचं. गरज वाटल्यास पाणी वापरायचं. तेल लावून पीठ तिंबून ठेवायचं. अर्धा तास झाकून ठेवायचं.

  3. 3

    मळलेल्या पिठाचे छोटे गोळे काढून चपातीसारखे लाटून घ्यायचे. शार्प काठ असलेल्या वाटीने पुऱ्या काढून घ्यायच्या.

  4. 4

    माध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्यायच्या. श्रीखंड किंवा आमरस सोबत पालक पुऱ्या खाण्यास तयार :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes