अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#HLR
अंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...
ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ सदस्य
  1. १२५ ग्राम अंबाडीची फुले
  2. 3-4लसूण पाकळ्या
  3. 1/2 टेबलस्पूनजीरे
  4. 3-4 टेबलस्पूनबारीक कलेला गुळ (आवडीनुसार कमी जास्त करु शकता)
  5. 2-3लाल मिरच्या
  6. १/२ टेबलस्पून तिखट
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    अंबाडीच्या फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्याव्यात व स्वच्छ पाण्याने धुऊन बाजूला ठेवाव्यात.
    चटणी साठी लागणारे सर्व साहित्य बाजूला काढून ठेवावे.

  2. 2

    वरील सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक वाटण करुन घ्यावे.

  3. 3

    तयार आहे आपली अंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.... 💃 💕

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes