मुंगाचे सुप (moongache soup recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#Soupsnap
#cooksnap
#VarshaIngoleBele
आज मी वर्षा ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे... थोडासा बदल केला. पण सुप अतिशय सुंदर झाले. थँक्स डियर🙏🏻
खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी असून पचायला देखील हलकी. घरातील आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल अशी रेसिपी म्हणजेच *मुगाचे सूप*...
मिनरल्स, विटामिन फायबर युक्त असे हे सूप... यामध्ये आर्यन खूप प्रमाणात असल्याने, ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे सूप आहे. या सुपच्या नेहमी सेवनाने शरीरातील थकवा कमी होतो. डिटॉक्स करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो..
तेव्हा आपल्या आहारात नक्की या सुपचा समावेश करा.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/4 कपहिरवे मुग
  2. 1गाजर
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 2टोमॅटो
  5. 1/4 टीस्पूनकाळी मिरे पावडर
  6. 1/4 टीस्पूनजीरे पावडर
  7. सैधव मीठ चवीनुसार
  8. थोडासागुळ(ऐच्छिक)
  9. 2 कपपाणी (सोयीनुसार कमी जास्त करु शकता)
  10. थोडीशी कोथिंबीर
  11. 1 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    हिरवे मुंग स्वच्छ धुऊन एक-दोन तास पाण्यात भिजत घालावे. नंतर भिजवलेले मुंग, मिरची, टोमॅटो, गाजर कुकर मध्ये एक शिट्टी देऊन शिजवून घ्यावे.

  2. 2

    शिजवलेली डाळ थंड करून घ्या व नंतर मिक्सर च्या पॉट मध्ये घालून स्मूथ पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    ही पेस्ट पॅनमध्ये काढून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून, ही पेस्ट पातळ करुन घ्यावी.व यामध्ये मिरे पावडर, चवीनुसार मीठ, गुळ, जीरे पावडर मिक्स करून, गॅस वरती ठेवून उकळी येऊ द्यावी.

  4. 4

    एक दोन उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालावी. वरून तुप घालून गरमागरम मुंगाचे सुप सर्व्ह करावे.. 💃 💕

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes