डिंक आणि सुका मेव्याचे लाडू (dink sukha mevyache laddu recipe in marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

# trending recipes
हिवाळ्याचे दिवसात जास्त एनरजेटिक आणि पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. डिंकाचे सेवन केल्याने अशक्तपणा नाहीसा होतो. लहान मुले आणि बाळंतिणीला हे लाडू खायला देतात.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 250 ग्रामखारीक पावडर
  2. 100 ग्रामबदाम
  3. 100 ग्रामकाजु
  4. 100 ग्रामकिशमिश
  5. 100 ग्रामअक्रोड
  6. 100 ग्रामखाण्याचा डिंक
  7. 100 ग्रामअंजीर
  8. 5-6 जायफळ वेलच्या
  9. 100 ग्राममखाणा
  10. 100 ग्रामखोब्राकीस
  11. 300 ग्रामसाजूक तूप
  12. 200 ग्रामसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम साहित्य काढून घेतले. अंजीर कापून घेतले. मखाना भाजुन पावडर तयार करून घ्यावे.

  2. 2

    तुपात डिंक तळून घ्यावे. व त्याची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    काजु, बदाम, अक्रोड मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. खारीक ची पावडर तुपात भाजून घ्यावी.

  4. 4

    साजूक तुपात सर्व मिश्रणे भाजून घ्यावी.

  5. 5

    मखाना आणि खोब्राकिस तूपातून भाजुन घ्यावा.

  6. 6

    सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.

  7. 7

    साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्यावा. व मिश्रणात घालून छान मिक्स करून घ्यावे.

  8. 8

    थोडे थंड झाल्यावर लाडू वळावेत. चविष्ट डिंकाचे लाडू हिवाळ्यात गरम आणि पोष्टीक असतात.

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes