पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम पनीर
  2. 1पालक जूडी
  3. 4-5 हिरव्या मिरच्या
  4. 6-7 लसूण पाकळ्या
  5. 2आले चे तुकडे
  6. 1 टीस्पूनकसूरी मेंथी
  7. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  8. 5-6 काजू
  9. तेल किंवा बटर
  10. चवीनुसारमीठ घालावे
  11. फ्रेश क्रीम
  12. 2कांदे
  13. 1टोमॅटो
  14. 1 टीस्पूनजीरे

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण पालक जूडी निवडून स्वच्छ धुवून घ्यावे मग एक कढ ईमधे पाणी घालून त्यात मीठ घालून पालक त्यात घालावा व पाच मिनिटे ब्लांच करून घ्यावा. मग लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आले, व मीठ हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यावे काजू पाच मिनिटे पाण्यात भिजत घालून ठेवावे मग पाण्यातून काढून भाजून पेस्ट करून घ्यावी. मग पालकांची पेस्ट करून घेणे
    कांदे व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे..

  2. 2

    एक कढ ईमधे बटर घालून त्यात पनीर फ्राय करून काढून घ्यावे मग त्यात अनेक बटर घालावे व त्यात जीरे घालावे जीरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे मग थोड्या वेळाने त्यात टोमॅटो घालून परतावे मग त्यात हिरव्या मिरच्या आले लसूण पेस्ट घालून परतावे मग त्यात कसूरी मेंथी काजू पेस्ट घालून परतावे मग त्यात किचन किंग मसाला घालून परतावे मग त्यात पालक प्युरी घालून मिक्स करावे व पनीर पण त्यात घालावे व थोडे पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे नंतर एक वाटी मध्ये काढून वरून फ्रेश क्रीम घालून

  3. 3

    गरम गरम सर्व्ह करावे चपती,भात फुलके, रोटी बरोबर छान लागतो पालक पनीर 😋😋👌👍

  4. 4

    टीप ‌...पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा यामुळे पुलावाला छान सुगंध प्राप्त होते....😊👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
मी नेहमी ही रेसिपी करते पण आज तुमच्याप्रमाणे केली व फक्त वरून तडका दिला.

Similar Recipes