पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. स्वच्छ धुूवून निथळून व गरम मीठ पाण्यांत ब्लांच करून घेतलेली
  2. जुडी पालकची पाने
  3. कांदे
  4. टोमँटो
  5. हिरव्या मीरच्या
  6. १/२ इंच आल्याचा तुकडा
  7. १०-१२ लसणीच्या पाकळ्या
  8. १/२ चमचा हींग
  9. १५० ग्रॅम पनीर
  10. १ चमचा लाल तिखट
  11. १/२ चमचा हळद
  12. १/२ चमचा गरम मसाला
  13. ४ चमचे तेल
  14. चविनुसार मीठ
  15. २ चमचे साय
  16. १ चमचा कसूरी मेथी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम कांदा, २ हिरव्या मिरच्या, ६पाकळ्या लसूण वआलं यांची पेस्ट करून घ्यावी. नंतर अनुक्रमे टोमँटो व पालकच्या पानांची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    नंतर एका भांड्यात २ चमचे तेल गरम करून त्यांत हींग घालावा व लगेचच कांद्याची पेस्ट घालावी २-४ मिनीटे परतून झाल्यावर टेामँटोची पेस्ट घालावी व परत थोडेसे परतवून घ्यावे. नंतर त्यांत वरील सर्व मसाले घालावेत.

  3. 3

    नंतर त्यांत पालकची पेस्ट घालावी व सर्व जिन्नस एकजीव करावेत व १/२ कप पाणी घालून एक उकळी येवू द्यावी.(पालक ब्लांच केलेले पाणी फेकू न देता ह्या भाजींत वापरावे).

  4. 4

    नंतर त्यांत पनीरचे तुकडे घालावेत व थेाडे शिजू द्यावेत. नंतर त्यांत साय फेटून घालावी व कसूरी मेथीही चुरून घालावी. सरते शेवटी २ चमचे तेल राहीलेल्या लसणीच्या पाकळ्या व १ हिरवी मिरची घालून चरचरीत फोडणी तयार करावी व भाजीवर घालावी.

  5. 5

    अशी ही गरमागरम पालक पनीरची भाजी गरमागरम नान सेबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes