पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974

#EB2 #W2
पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी,

पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)

#EB2 #W2
पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० ते ४० मिनिटे
३ ते ४ व्यक्ती
  1. 1 कपघरी केलेले पनीर
  2. 1 टीस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनतूप
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 1सिमला मिरची बारीक चिरलेली
  6. 2टोमॅटो बारीक चिरलेले
  7. 1 चमचाअल लसूण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  11. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 2 टेबलस्पूनसाय
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. 1 टीस्पूनकोथिंबीर
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० ते ४० मिनिटे
  1. 1

    घरी केलेले पनीर घेतले,पनीर भुरजीसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घ्यावी.

  2. 2

    कांदा,टोमॅटो,सिमला मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  3. 3

    आता कढईत 1चमचा तेल व 1चमचा तूप घालावे,व तेल तूप गरम झाले की त्यात कांदा घालून 2 ते 3मिनिटे परतून घ्यावे,मग त्यातआलं लसूण पेस्ट घालावी,छान परतून झाले की सिमला मिरची घालावी

  4. 4

    सिमला मिरची कांद्याचा रंग बदलला की त्यात टोमॅटो घालावे,थोडे मीठही घालावे,

  5. 5

    आता हळद,किचन किंग मसाला,धना जीरे पावडर,गरम मसाला,लाल तिखट,घालून त्यात पाणी घालावे

  6. 6

    पाणी घालून चांगले उकळू द्यावे,आता त्यात साय घालावी,साय घातल्यावर चांगले हलवून घ्यावे, भाजीतआता किसून पनीर घालावे,आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालावे,भाजी छान हलवून घ्यावी

  7. 7

    आपली पनीर भुरजी तयार झाली आहे,वर कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यासाठी करावी,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @pallavi_1974
रोजी

Similar Recipes