पौष्टिक डोसा (dosa recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

ज्यांना वजन कमी करायचं आहे . व जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी . चवीला ही छान लागतो व सर्व पोषक तत्वे मिळतात .

पौष्टिक डोसा (dosa recipe in marathi)

ज्यांना वजन कमी करायचं आहे . व जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी . चवीला ही छान लागतो व सर्व पोषक तत्वे मिळतात .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 1/2 वाटी हिरवे मूग
  4. 1/2 वाटी हरभरा
  5. 1/2 वाटीराजमा
  6. 1/2 वाटी मटकी
  7. 1/2 वाटी नाचणी
  8. 1/2 टीस्पून मेथी दाणे
  9. मीठ चवीनुसार
  10. गरजे नुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व कडधान्य स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात रात्र भर भिजत घालावे.सकाळी ते स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    हे मिश्रण पाच तास तसेच झाकण लावून ठेवावे.जस आपण डोसा व इडली साठी ठेवतो.त्यानंतर पीठ चांगले फुलेन.त्यानंतर पिठात चवी नुसार मीठ घालून चांगले घालवून घ्यावे.

  3. 3

    डोसा तव्यावर तेल किंवा तूप लावून डोसे बनवून घ्यावे.अतिशय चविष्ट असा सोडा बनतो.हा डोसा तुम्ही हिरवी चटणी नाहीतर कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes