मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#EB8 #W8
मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...
मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.
चला पाहूया मटकीची उसळ.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२०-४० मिनिट
  1. 2 वाटी मोड आलेली मटकी
  2. 1कांदा चिरून
  3. 2 चमचेलसुण पेस्ट
  4. 1 चमचातिखट
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. कोथिंबीर
  8. फोडणीसाठी तेल मोहरी

कुकिंग सूचना

२०-४० मिनिट
  1. 1

    सगळं साहित्य तयार ठेवा. मटकी कुकर मध्ये थोडी वाफवून घ्या म्हणजे लवकर शिजते.

  2. 2

    तेल गरम झाले की मोहरी घाला. नंतर कांदा घालून थोड मीठ घालून परतून घ्या.

  3. 3

    कांदा झाल्यावर लसुण पेस्ट घाला.

  4. 4

    आता तिखट, हळद व मीठ घालून मिक्स करा व मटकी घालून मिक्स करा.

  5. 5

    आवश्यतेनुसार पाणी घाला. छान वाफ आल्यावर कोथिंबीर घालून मिक्स करा.

  6. 6

    गरमा गरम मटकीची उसळ शेव घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes