रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिट
  1. तीळ गुळाचे आतील मिश्रण :-
  2. 2 कपगुळ
  3. 1/4 कपखसखस
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 1/2 कपतीळ
  6. 1 कपबेसन
  7. 1/4 कपतेल (बेसन भाजायला)
  8. 3 टीस्पूनवेलची पावडर
  9. 1/4 टीस्पूनजायफळ पावडर
  10. 2 टेबलस्पूनसुक खोबरं किस
  11. कव्हर :-
  12. 2 कपगव्हाच पीठ
  13. 1/4 टीस्पूनमीठ
  14. पाणी आवश्यक ते नुसार
  15. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य तयारी करून घ्या, त्यात तीळ, खोबरं, शेंगदाणे, खसखस भाजून घ्या. गूळ किसून घ्यावा.

  2. 2

    बेसन तेलावर खमंग भाजून घ्यावे सोनेरी रंगावर.

  3. 3

    भाजून घेतलेले कोरडे जिन्नस आणि त्यात वेलची जायफळ पावडर घालून बारीक पेस्ट करून घ्या.

  4. 4

    गूळ व वाटून घेतलेली कोरड्या जिन्नस पेस्ट घालून मिक्स करा, व भाजून घेतलेलं बेसन घालून एकजीव करून घ्या.

  5. 5

    गव्हाचे पीठ नेहमी सारखे भिजवून घ्या, व त्याचे गोळे करून घ्या, त्याच प्रमाणे तयार गुळाचे गोळे करा.

  6. 6

    आता 2 गव्हाचा पिठाचे गोळे घ्या व ते पुरी प्रमाणे लाटून घ्या. व त्यातल्या एका पुरी वर गूळ पसरवून घाला, व दुसरी पुरी त्यावर ठेवून कडा दाबून घ्या.

  7. 7

    आता कोरड्या गव्हाचा पिठात घोळवून पोळी हलक्या हाताने लाटून घ्यावी, एकीकडे तवा तापत ठेवून पोळी खमंग भाजून घ्या. पोळी उलटल्यावर खालचा बाजूने खमंग भाजली गेली की पेपर वर गार व्हायला ठेवा, अश्या पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घ्या.

  8. 8

    सर्व्ह करताना गायीचा तुपा बरोबर आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes