ॲपल बोराचा मेथ्यांबा (apple boracha methamba recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

सध्या सगळीकडे भरपूर बोरं उपलब्ध आहेत.आम्हीही रोज बोरं आणून खातो.आम्हाला ताटात डावीकडचे पदार्थ जरा जास्तच आवडतात.बोरांपासूनही काहीतरी वेगळं करावं असं वाटलं आणि सहज मेथ्यांबा करून पाहिला आणि प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद उपभोगता येतोय! आपल्या साठी रेसिपी:

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मिनिटे
4-5  जणांसाठी
  1. 200 ग्रामऍपल बोरं (दोन मोठी)
  2. 1 टेबलस्पूनगुळ
  3. 1 टीस्पूनतेल
  4. चिमूटभरहिंग
  5. मोहरी फोडणीसाठी
  6. 15-20मेथी दाणे
  7. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  8. 1/4 टीस्पूनतिखट
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 छोटातुकडा दालचिनी
  12. 1/2 टीस्पूनधणे पावडर

कुकिंग सूचना

10-12 मिनिटे
  1. 1

    बोरं स्वच्छ धुवून पुसून फोडी करून घ्याव्या

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद,मेथी दाणे, दालचिनी तुकडा घालून फोडणी करावी.बोराच्या फोडी घालून धणे पावडर, तिखट, मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून 7-8 मिनिटे शिजू द्यावे.(बोरं शिजायला वेळ लागतो.)

  3. 3

    बोरं शिजली की, त्यात आमचूर पावडर आणि गुळ घालावा.दोन तिन वाफा आणाव्यात.गॅस बंद करावा. बोराचा मेथ्यांबा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes