छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-४५ मिनीटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्राम चिकन
  2. १०० ग्राम उकडलेले छोले (काबुली चणे)
  3. 3मध्यम आकाराचे कांदे (उभे चिरलेले)
  4. 1 कपटमाटर प्युरी (२ टमाटर घेऊन)
  5. 1/2 कपघट्ट दही
  6. 3 टेबल स्पूनतेल
  7. 1 इंचआलं (ठेचून)
  8. 6-7पाकळ्या लसूण (ठेचून)
  9. 2हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  10. 1/2 कपकोथिंबीर
  11. २५० मि. ली. पाणी (चणे उकडवून उरलेले)
  12. चवीनुसारमीठ
  13. पावडर मसाले:
  14. 2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  15. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  16. 1/2 टेबलस्पूनधणे जीरे पावडर
  17. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  18. 1/2 टेबलस्पूनकसूरी मेथी
  19. 1/4 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

४०-४५ मिनीटे
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा.

  2. 2

    आता परतलेल्या कांद्यामध्ये चिकनचे तुकडे आणि ठेचलेले आलं-लसूण घालून तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

  3. 3

    आता फ्राय केलेल्या चिकन मध्ये कसुरी मेथी सोडून बाकी सर्व पावडर मसाले एकत्र करावे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

  4. 4

    वरील मिश्रणात टोमॅटो प्युरी घालून मिश्रण तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

  5. 5

    आता चिकन मध्ये भेटलेले घट्ट दही मिसळून चिकन आठ ते दहा मिनिटे झाकून मंद आचेवर शिजवावे.

  6. 6

    दही घालून शिजवल्यानंतर चिकन मध्ये उकडलेले शोले घालावे नंतर त्यात 250 मिली पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे.
    आता मिश्रणात हिरव्या मिरच्या आणि कसुरी मेथी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे चिकन झाकून शिजवावे.

  7. 7

    छोले चिकन रस्सा चांगला उकळला की त्यात कोथिंबीर गार्निश करावी आणि तयार छोले चिकन भाकरी, पराठा किंवा राईस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes