भाज्यांचे लोणचे (bhajyanche lonche recipe in marathi)

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

#EB11
#W11
या आठवड्यात मी झटकन आणि कमी वेळात होणाऱ्या अशा भाजीच्या लोणच्याची रेसिपी देत आहे. चवीला एकदम भन्नाट लागते आणि कमी वेळेत होणारे असल्याने सर्वांनाच करायला आवडेल असे हे लोणचे आहे.

भाज्यांचे लोणचे (bhajyanche lonche recipe in marathi)

#EB11
#W11
या आठवड्यात मी झटकन आणि कमी वेळात होणाऱ्या अशा भाजीच्या लोणच्याची रेसिपी देत आहे. चवीला एकदम भन्नाट लागते आणि कमी वेळेत होणारे असल्याने सर्वांनाच करायला आवडेल असे हे लोणचे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
  1. 1/2 कपमटार दाणे
  2. 1/2 कपगाजर बारीक चिरून
  3. 1/2 कपफ्लॉवरचे तुरे बारीक चिरून
  4. 1/4ओली हळद बारीक चिरून
  5. 1/4आले बारीक चिरून
  6. 4-5 मिरच्या बारीक चिरून
  7. 1कैरी बारीक चिरून (मला उपलब्ध न झाल्याने मी घालू शकले नाही)
  8. 1-2 लिंबु
  9. 1/2 कपलोणच्याचा मसाला (घरचा अथवा विकतचा कैरी साठी वापरतो तो)
  10. मीठ (गरजेनुसार)
  11. 1 कपतेल

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून आणि चांगल्या कोरड्या करून बारीक चिरून घ्याव्यात, त्याचवेळी एका छोट्या कढईत तेल गरम करत ठेवून ते कडकडीत गरम झाल्यावर गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.

  2. 2

    आता सर्व भाज्या एकत्र एका भांड्यात घेऊन त्यावर लोणच्याचा मसाला आणि मीठ घालावे. मसाला आणि मीठ सगळीकडे एकसारखा लागेल याप्रमाणे ढवळून घ्यावा. नंतर गरजेनुसार लिंबु पिळून परत ढवळावे.

  3. 3

    सर्वात शेवटी गार झालेले तेल वरील मिश्रणात घालावे आणि ढवळावे आणि हे तयार लोणचे बरणीत भरून ठेवावे. (शक्यतो फ्रिजमध्ये ठेवावे 8 ते 15 दिवस हे चांगले टिकते)

    टीप- मसाल्यात जर आधीच मीठ असेल तर वरून वेगळे मीठ घालण्याची गरज नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes