मिक्स भाज्यांचे चटपटीत लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

मिक्स भाज्यांचे चटपटीत लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
5 जणासाठी
  1. 1/2 कपफरसबी बारीक चिरून
  2. 1/2 कपफ्लॉवरचे छोटे तुकडे
  3. 1/4 कपमटार
  4. 1/4 कपगाजर बारीक तुकडे करून
  5. 4हिरवी मिरची उभी चिरून
  6. 1लिंबू बारीक फोडी करुन
  7. 1/2टिस्पून हळद
  8. 1टिस्पून मेथी दाणे तळून
  9. 1टिस्पून लाल तिखट (बेडगी मिरची पावडर)
  10. 1टिस्पून हिंग
  11. 3टिस्पून मोहरीची पूड
  12. 8-10लसूण पाकळ्या
  13. 2 टेबलस्पूनगुळ
  14. 1 इंचआल बारीक चिरून
  15. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  16. मीठ चवीनुसार
  17. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    वरील सर्व भाज्या आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात मीठ घालून ठेवाव्यात. दुसर्‍या दिवशी सकाळी फडक्यावर पसरवाव्यात.

  2. 2

    कोरडया झाल्यावर त्यात वरील सर्व जिन्नस मिसळून लिंबाचा रस टाकावा. तेलात मेथी दाणे तळून,जाडसर भरडून घेऊन मिश्रणात टाकून मिसळून घ्यावेत.

  3. 3

    नंतर तेल गरम करून गॅस बंद करून हिंग, हळद घालून,तेल थंड झाल्यावर मिश्रणात फोडणी ओतावी. छान मिक्स करुन घ्यावेत.

  4. 4

    हे लोणचे ताजे ताजे करुन खावे.वरण भातासोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes