सोयाबीन (‌सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

सोयाबीनला शाकाहारी मटण असेही म्हणतात.
नाॅनव्हेजच्या भाजी सारखी भाजी होते.नक्की करून बघा.
वाटलेला मसाला घालून ही भाजी करता येते.

सोयाबीन (‌सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)

सोयाबीनला शाकाहारी मटण असेही म्हणतात.
नाॅनव्हेजच्या भाजी सारखी भाजी होते.नक्की करून बघा.
वाटलेला मसाला घालून ही भाजी करता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 1/2 कपसोया चंक्स
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 1 टेबलस्पूनकांदा-लसूण मसाला
  6. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. १ १/२ टेबलस्पून एव्हरेस्ट मीट मसाला
  9. तेल
  10. पाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सोयाबीन स्वच्छ धुऊन थोडे पाणी व मीठ घालून उकळून घेणे.झाकण ठेवून २०-२५‌ मिनिटे ठेवणे. त्यातील पाणी हाताने दाबून काढून घेणे. दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन, पाणी दाबून काढणे.

  2. 2

    कांदा व टोमॅटोचे बारीक तुकडे करून घेणे.मिक्सरच्या भांड्यात कांदा व टोमॅटोचे तुकडे, लसूण पाकळ्या घालून घेणे. पेस्ट करून घेणे. गॅसवर कढईत तेल घालणे.तेल तापले कि वाटलेली पेस्ट घालून त्यातील पाणी निघून जाईपर्यंत परतवून घेणे. सर्व मसाले व मीठ घालून घेणे.

  3. 3

    मसाले व्यवस्थित परतल्यानंतर त्यात निथळून घेतलेले सोयाबीन त्यात घालून परतावे.हवे तेवढे पाणी घालून घेणे.जशी आपल्याला घट्ट किंवा पातळ हवी तसे पाणी घालून घेणे.

  4. 4

    झाकण ठेवून दहा-पंधरा मिनिटे भाजी शिजू द्यावी. गॅस बंद करावा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes