झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमबेसन पीठ
  2. 2कांदे
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. कडीपत्ता
  5. 1/2 चमचहळद
  6. 7-8लसूण पाकळ्या
  7. तेल (आवश्यकतेनूसार)
  8. 1/2 चमचामोहरी
  9. 1 चमचाहिंग
  10. मीठ चवीनूसार
  11. कोथिंबीर
  12. 1 वाटीनाचणीचे पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसनचे मिश्रण तयार ठेवा. त्यात मीठ घालून चव पहा.

  2. 2

    कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालून लालसर परतावी. नंतर मोहोरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून परतावे

  3. 3

    कांदा छान परतला गेला की त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. १५-२० सेकंद परतावे. आच मंद करून भिजवलेले बेसन घालावे. सारखे ढवळावे. गुठळ्या होवू देऊ नयेत.

  4. 4

    कढईवर झाकण ठेवून बेसन मंद आचेवर शिजू द्यावे. मध्येमध्ये ढवळावे म्हणजे करपणार नाही. साधारण ५-८ मिनिटात झुणका तयार होईल. शिजलेला झुणक्याचा रंग लगेच कळून येईल.गरम झुणका भाकरीबरोबर वाढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes