ज्वारीचे कुरकुरीत खारवडया/सांडगे (Jowariche Sandge Recipe In Marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
विदर्भातील प्रसिद्ध ची रेसिपी आहे की उन्हाळ्यात तयार केली जाते
ज्वारीचे कुरकुरीत खारवडया/सांडगे (Jowariche Sandge Recipe In Marathi)
विदर्भातील प्रसिद्ध ची रेसिपी आहे की उन्हाळ्यात तयार केली जाते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सर मधून ज्वारीचं जाडसर पीठ करून घ्यावे
- 2
पीठ चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवावे थोडे मीठ आणि पाणी घालून
- 3
2,1/2 ग्लास पाणीउकळायला ठेवावे पाणी उकळले की मी त्यात पांढरे तिळ ओवा आणि मीठ आणि लाल तिखट घालावे
- 4
आपण बॅटर तयार केलं होतं ते थोडं थोडं एकत्र करावे 15 ते 20 मिनिटांसाठी शिजू द्यावे
- 5
शिजल्यानंतर आंबवणयासाठी झाकून ठेवावे आमलया नंतर
- 6
पीठ छान मळून छोट्या छोट्या खारवडया/ सांडगे तयार करावे
- 7
2 दिवस उन्हात वाळवुन सव॔ह कराव्यात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचे सांडगे (gavache sandge recipe in marathi)
#पारंपारीकरेसिपीकोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय ते या रेसिपी मधुन कळते. खरच पूर्वी लोक काहीही वाया घालवत नसत.अगदी भाजीच्या देठांची,सालांची चटणी,उरलेल्या कुठल्याही पदार्थापासुन नविन पदार्थ करणे या मधे तर घरातील स्त्रीयांचा हातखंडा च असे.आणि हे अदार्थ तितक्याच चविने घरातले खात असत.अशीच ही एक गव्हाच्या सांडग्यांची रेसिपी..... जेव्हा कुरडया करतो तेव्हा चिक काढुन उरलेला चोथा बहुतेक लोक तो फेकुन देतात किंवा आंबोण म्हणून गायीला खायला देतात.पण या गव्हाच्या चोथ्याला फेकुन न देता माझी आई दरवर्षी याचे सांडगे करते.कारण हा चोथा खुप पौष्टीक असतो. हे सांडगे खुप छान खुसखुशित होतात.आपण तसेही खिचडीसोबत तळुन खाउ शकतो किंवा याची भाजी ही करु शकतो.तर मग पाहुया याची रेसिपी....... Supriya Thengadi -
-
विदर्भाचे धापोडे/ पापड (Dhapode Papad Recipe In Marathi)
विदर्भातले ज्वारीचे धापोडे खूप प्रसिद्ध आहेत उन्हाळ्यातली रेसिपी आहे Priyanka yesekar -
मराठवाडा स्पेशल ज्वारीचे थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#KS5थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो. थालीपिठ ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची ज्वारीच्या थालिपीठाची रेसिपी घेऊन आले आहे.थालिपीठ म्हणलं की भाजणीचं हेच डोळ्यापुढे येतं.त्याची सर कशालाच नाही.खूप अनुभवी हातांनी योग्य प्रमाणात आणि अचूक अशी भाजलेली भरपूर धणे भाजून घातलेली भाजणी...त्याचे थालिपीठ...मस्त भरपूर कांदा-कोथिंबीर... सोबत लोण्याचा गोळा....ताजे नवे घातलेले कैरीचे लोणचे किंवा लिंबाचे मुरलेले...आणि तव्यावरुन पानात आले की जे स्वर्गसुख मिळते ते कश्शातच नाही.स्वयंपाकाच्या कंटाळ्याला चोख पर्याय थालिपीठच..वेळ आणि भूक दोन्ही भागवणारा.ही भाजणी म्हणजे पंचधान्य,सप्तधान्य घालून केलेली.आपली दररोजच्या वापरातील सगळी धान्ये यात येतातच.जास्त प्रमाण ज्वारी बाजरीचे,त्याहून कमी गहू,तांदूळ,हरभराडाळ,उडीदडाळ, मूगडाळ इ.इ.डाळींऐवजी ती कडधान्ये घेतल्यास अधिकच पौष्टिक. कधी नाचणी,वरई,चवळी,सोयाबीनही घालतात.गुजराथकडे ही धान्य न भाजताच फक्त एकत्र करुन दळून थालिपीठ करतात.कोकणात तांदळाची कांदा घालून केलेली थालिपीठं मस्तच लागतात.भाजणी करेपर्यंत मात्र ज्वारीची थालिपीठेही आनंद देतात...कधी कोबी,कधी गाजर असे घालून.भरपूर प्रोटीन्स आणि कार्ब्ज चा स्त्रोत आपल्या पूर्वजांनी थालिपीठ रुपाने दिलाय आणि घरोघरी ती आवर्जुन केली जातातच!माझी एक काकू आहे अप्रतिम भाजणी करते...ती साधी थालिपीठाची किंवा चकलीची किंवा उपासाची असो....तिच्या हातची ही चव कुठेच नाही.ही मराठवाड्याकडची थालिपीठं तुम्हालाही आवडतील अशीच!!😊 Sushama Y. Kulkarni -
ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
#KS5मराठवाडा स्पेशल रेसिपी...ज्वारी कोवळी असते तेव्हा त्यास हुरडा म्हणतात ह्याचे व ज्वारीच्या पिठाचेही धपाटे बनवतात. धप धप थापल्याने त्यास धपाटे नाव पडले असावे. Manisha Shete - Vispute -
ज्वारीचे पौष्टिक थालिपीठ (jowariche paushtik thalipeeth recipe in marathi)
#GA4 #WEEK16 #KeywordJowar थंडी आली की आपल्याला चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. पण हे पदार्थ जीभेसाठी जरी चविष्ट असले तरी आपल्या पोटासाठी मात्र घातक ठरतात. म्हणूनच काहीसे डाएट सांभाळत गरमागरम व खमंग थालिपीठचा आस्वाद घेणे म्हणजे पर्वणीच! यासाठी घेऊन आले आहे, ज्वारीच्या पिठाचे खमंग चविष्ट व पौष्टिक थालिपीठ. बनवण्यास अत्यंत सोपे, कमी वेळात तयार होणारे व घरातील सर्वांना खावेसे वाटणारे ज्वारीचे थालिपीठ. सुहिता धनंजय -
ज्वारीचे खमंग थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#ज्वारीचे_खमंग_थालिपीठ..😋देखा एक ख्वाब....😍 थालीपीठ हे मराठी खाद्यपरंपरेला पडलेलं खमंग खरपूस स्वप्न !!!! या वाक्यात मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये..😊कारण जेव्हां हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजणीचा डबा नुसता जरी उघडला तरी खमंग दरवळ चोहीकडे पसरतो..आणि मग सुरु होतो हा खमंग वासाने वेड लावणारा स्वप्नपूर्तीचा प्रवास...😋 परातीमध्ये भाजणी घेतल्यावर त्यात थालिपीठाचा स्वाद सातवे आसमान पर पहुंचानेवाला त्याचा जानी दोस्त कांदा तर हवाच..तसा नियमच असतो तो..😜 अगदी Hit जोडगोळी आहे ही..अगदी अमिताभ-रेखा सारखी..आणि नंतर तुम्ही तुम्हांला हव्या त्या भाज्या,मसाले add केले की हमखास जिभेवर रेंगाळणारी चव तुमच्यासमोर हजर..😋आणि रेंगाळणार्या या चवीचा आस्वाद घेण्याचा सिलसिला आजन्म सुरुच राहतो...😀 दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या ‘खमंग’मध्ये थालीपिठाला पहिलं स्थान दिलंय. त्या म्हणतात, ‘दौपदीला जी थाळी मिळाली होती, तिच्यावरून ‘स्थाली पाक’ हा शब्द आला. थाळीत काहीही शिजवता येतं. ही तव्याच्या पूर्वीची, खोल मातीची किंवा धातूची असे. या थाळीत थालीपिठं, पिठलं, भात व भाकरीही होत. थालीपीठ म्हणजे थालीत शिजवलेला पिठाचा पदार्थ’... चला तर मग या खमंग स्वप्नपूर्तीचा प्रवास करु या... Bhagyashree Lele -
-
मराठवाडा वेळ अमावस्या स्पेशल ज्वारीचे आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते तेथील लोक शेतात जाऊन वेळ अमावस्या साजरी करतात वेळ अमावस्या साठी खास ज्वारीचे आंबील बनवून पिले जाते त्या दिवशी विशेष असा बेत मराठवाडा भागात तयार केला जातो ज्वारीचे पिठाचे आंबील, गव्हाची खीर, उंडे ,भजी तयार करून शेतात जेवायला जातात. ज्वारीचे आंबील तयार करून थंड करून मातीच्या भांड्यात ठेवून झाडाखाली ठेवतात त्यामुळे आंबील गार झाल्यावर ते पिले जातेज्वारीचे पीठ टाकून कोथिंबीर ,मिरच्या ,लसूण ,जिराचा वापर करून आंबील तयार केले जातेमराठवाड्यात ज्वारी-बाजरी जास्त प्रमाणात घेतली जाते ज्वारी आणि बाजरी पासून उंडे तयार केली जातात ज्वारी आणि बाजरीची उंडे, वांग्याचे भरीत, तिळाचे मुटके अशी बरेच पदार्थ मराठवाड्यात तयार केली जातातहे ज्वारीचे आंबील वेळ अमावस्या च्या दिवशी प्यायचे असे मराठवाड्यात शास्त्र असते.तयार करायला ही अगदी सोपी अशी सरळ रेसिपी आहे नक्कीच आपण हे आंबील तयार करून आहारातून घेऊ शकतो.नक्कीच रेसिपी तून बघूया मराठवाडा स्पेशल वेळ अमावशेला तयार केली जाणारी ज्वारीच्या पिठाचे आंबील. Chetana Bhojak -
ज्वारीचे ओले धापोडे (jowariche ole dhapode recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल ज्वारीचे ओले धापोडे(पापड)प्रत्येक भागाचे काही तरी विशेष असतेच विदर्भात ज्वारी भरपुर प्रमाणात पिकते....भाकरी,आंबील, धापोडे,खारवड्या,ज्वारीच्या लाह्या चा चिवडा असे खूप पदार्थ केल्या जातात...ज्वारीची आंबील करून सकाळी शेतात जाण्याआधी लोक खावून जातात उन्हाळ्यात अतिशय थंड असते....त्याचे पापड पांढऱ्या धोत्रावर घातले जातात.. चादरीवर सुद्धा चालते.....आणि मग त्यावर पाणी मारून संध्याकाळी ते पापड ओले काढून खाण्याची पद्धत आहे.....अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ......नक्की करून पहा. Shweta Khode Thengadi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#cooksnapआपण नेहमीच पालक पराठा करतो पण आज मी आपली ऑर्थर शरयू ची रेसिपी रीक्रीए केली आहे. खरंच cooksnap निमित्याने आपल्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपी करण्याचा चान्स मिळत आहे. Thank you शरयू पालक पराठा खूपच छान झाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
# कुकस्नॅप# कल्पनाताई चव्हाण यांची ही रेसिपी केली आहे.माझे माहेर मराठवाडातले असल्याने ही रेसिपी करताना माझ्या आईची आठवण झाली.पुन्हा मी बालपणात रमले! ! ! Shital Patil -
गाजराचे सांडगे (Gajarache sandge recipe in marathi)
#गाजर #वाळवण #गाजर_सांडगे ....हा एक वाळवणिचा म्हणजे उन्हात वाळवून साठवणिचा प्रकार आहे....खिचडी सोबत पापड ,सांडगे हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच फार आवडत... सांडगे खूप वेगवेगळ्या प्रकारे करतात पण माझ्याकडे फक्त गाजर आणि टमाटर मीक्स सांडगे सगळ्यांना खूप आवडतात..... म्हणून मी हे केलेत....हिवाळ्यामध्ये मिळणारे लालचुटूक गाजर आणून त्याचे मी असे सांडगे करून ठेवत असते आणि स्टोअर करून ठेवते जेवायच्या वेळेस खिचडी पिठलं वगैरे जेव्हा असतं तेव्हा हे पटकन तोंडीलावणे तेलात तळून खाता येतात.... Varsha Deshpande -
सांडगे (Sandge Recipe In Marathi)
सांडगे उन्हाळ्यात केले जातात. पावसाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच वेळेस भाजी जाऊन खरेदी कारण्यासच अडचण निर्माण होते. गावाकडे तर पावसात चार-चार दिवस बाहेर पडायची मुश्किल होते. अश्या वेळी सांडग्याची भाजी करता येते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
रवा चकली
#रवामला वाटते रवा एक सर्व गुण सम्पन पदार्थ आहे .हा सगळ्यांन बरोबर जुळवून घेतो .चकली ही सगळ्यां ची आवडती आहेच म्हणून मी अश्या एवरग्रीन रवा ची चकली बनवली👍 मस्त झाली आहे .😊 Jayshree Bhawalkar -
उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मेथी ज्वारीचे धपाटे (methi jowariche dhapte recipe in marathi)
#Cooksnap #अश्विनी वैद्य ची रेसिपी बघुन केले, खर तर धपाटे हे थापून धपाटून करतात म्हणून हे नांव पडलयं.पण मी लाटूनच केले माझा हात दुखतोय. हे महाराष्ट्रातील देशावर,नाशिक धुळे या ठिकाणी जास्त केले जातात.पोटभरू नि पोष्टीक पारंपरिक पदार्थ. Hema Wane -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
झटपट मसाला ईडली (masala idli recipe in marathi)
ईडली हा असा पदार्थ आहे की अगदी लहान मुलांन पासून ते मोठ्यानं पर्यंत सगळ्यांना खायला आवडते.कोणाला चटणी, सांबर, बरोबर तर कुणाला नुसती फ्राय करून पण आवडते.कधी तरी असे होते की चटणी आणि सांबर संपून जाते.परत चटणी करायचा कंटाळा पण येतो.म घाई चा वेळी ही झटपट होणारी मसाला ईडली ची रेसिपी बघू या. Sampada Shrungarpure -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
रस्सा सांडगे (rassa sandge recipe in marathi)
Sonal Isal Kolhe यांची रस्सा सांडगे हि रेसिपी (माझे बरेच ट्विस्ट वापरून) मी #Cooksnap केलेली आहे. :) सुप्रिया घुडे -
ज्वारीच्या पिठाची चकली (Jwarichya Pithachi Chakali Recipe In Marathi)
#DDRतुमच्याकडे चकलीची भाजणी तयार नसेल आणि भाजणी करायला वेळ नसेल तर ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तुम्ही करू शकता चकल्या खूप खुसखुशीत होतात Smita Kiran Patil -
-
गाजराचे सांडगे (Gajrache sandge recipe in marathi)
#winterspecialजसे उन्हाळी वाळवणं करतात तसेच काही वाळवणं हिवाळ्यातही करतात.कारण हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात,मग याचाच फायदा घेउन छान मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.....गाजराचे सांडगे आमच्या विदर्भात खुपच फेमस आहेत.हिवाळ्यात घरोघरी हे सांडगे करतात,वाळवुन छान जेवतांना तोंडी लावण्यासाठी खातात,खिचडीसोबतही खूप छान लागतात...तर पाहुया याची रेसिपी....,, Supriya Thengadi -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 भारतीय खाद्यसंस्कृतीमधे तीळाला अत्यंत महत्व आहे. तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचं सेवन केलं जातं. संक्रांतीला तीळ लावून भाकरी केली जाते. तसेच लाडू,चटणी असे प्रकारही केले जातात. आज मी तिळाची चटणी केली आहे. Prachi Phadke Puranik -
झणझणीत रस्सा सांडगे (sandage rassa recipe in marathi)
आपल्या ग्रुप मधली मैत्रीण," प्रिती जी साळवी" यांची सांडग्याची रेसिपी मी ट्राय केली आणि ते सांडगे वाळले सुद्धा आणि त्याची छान झणझणीत भाजी पण केली...अतिशय सुंदर भाजी झाली या सांडग्यांची...माझ्या मुलांना पण आवडली...छान तरी वाली मसाले ची भाजी केली ही...घरी केलेल्या सांडग्याची मजा काही और आहे..आम्ही याला मुगाच्या डाळीच्या वड्या म्हणतो..भाजी नसली की ऑप्शन मध्ये ही भाजी केव्हाही बेस्ट आहे Sonal Isal Kolhe -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16261041
टिप्पण्या