गाजराचे सांडगे (Gajrache sandge recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#winterspecial
जसे उन्हाळी वाळवणं करतात तसेच काही वाळवणं हिवाळ्यातही करतात.कारण हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात,मग याचाच फायदा घेउन छान मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.....गाजराचे सांडगे आमच्या विदर्भात खुपच फेमस आहेत.हिवाळ्यात घरोघरी हे सांडगे करतात,वाळवुन छान जेवतांना तोंडी लावण्यासाठी खातात,खिचडीसोबतही खूप छान लागतात...तर पाहुया याची रेसिपी....,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोगाजर
  2. 1कच्ची पपई
  3. तीन-चार टोमॅटो
  4. तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. सात-आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  7. 1/2 कपकोथिंबीर
  8. 1 चमचाआमचुर पुड
  9. 1 चमचाजीरे
  10. 1 चमचातीळ

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    प्रथम गाजर स्वच्छ धुवुन साले काढुन किसुन घ्या.पपई धुवुन साले काढुन,बिया काढुन किसुन घ्या.

  2. 2

    आता एका मोठ्या परातीत हा किस एकत्र करुन या मधे मिरची,बारीक चिरलेले टोमॅटो,तिखट,मीठ,जीरे,तीळ,आमचुर पुड एकत्र घालुन कालवुन घ्या.

  3. 3

    आता एका स्वच्छ प्लॅस्टीक शीट वर सांडगे घालुन कडकडीत उन्हात तीन दिवस वाळवुन घ्या.वाळुन झाले की हवाबंद डब्यात ठेवा.छान टिकतात.पाहीजे तेव्हा तळुन खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या (7)

Similar Recipes